CAA कायदा वाचला नसेल तर इटालियन भाषेत भाषांतरीत करुन देऊ, शाहांचा राहुल गांधीवर निशाणा

"राहुल गांधींनी जर नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) वाचला नसले तर त्यांना मी इटालियन भाषेत भाषांतरीत करुन देऊ शकतो", अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah criticized on Rahul Gandhi) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर केली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:42 PM, 3 Jan 2020
CAA कायदा वाचला नसेल तर इटालियन भाषेत भाषांतरीत करुन देऊ, शाहांचा राहुल गांधीवर निशाणा

जयपूर : “राहुल गांधींनी जर नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) वाचला नसले तर त्यांना मी इटालियन भाषेत भाषांतरीत करुन देऊ शकतो”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah criticized on Rahul Gandhi) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर केली. अमित शाह यांनी आज (3 जानेवारी) नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात राजस्थानमध्ये सभा घेतली होती. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा (Amit Shah criticized on Rahul Gandhi) साधला.

“राहुल बाबा यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा वाचला असेल, तर माझ्याोसबत चर्चा करायला या. जर कायदा वाचला नसेल तर मी तो इटालियन भाषेत भाषांतरीत करुन देऊ शकतो. काँग्रेस, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरवींद केजरीवाल, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी या कायद्याला विरोध करत आहेत. मी या सर्वांना आव्हान देतो की त्यांनी या कायद्यामुळे अल्पसंख्याकांचे नुकसान होणार आहे हे सिद्ध करुन दाखवावं”, असं अमित शाह म्हणाले.

“विरोधकांनी पाहिजे तेवढी अफवा पसरवा. पण भाजप या कायद्यावरुन एक इंचही मागे हटणार नाही. भाजपाकडून देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात जनजागृती अभियान सुरु करण्यात आलं आहे. ज्यांना वोटबँकेचे राजकारण करण्याची सवय झाली ते या कायद्याला विरोध करत आहेत. काँग्रेस पक्षाने नागरिकत्व कायद्याविरोधात खोटा प्रचार केला आहे. ज्यामुळे देशातील तरुण मंडळींचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे आम्ही या कायद्यासाठी जनजागृती करत आहे”, असंही शाह यांनी सांगितले.

शाह म्हणाले, “पाकिस्तान-बांगलादेश-अफगाणिस्तानमधून जे हिंदू, जैन, बौद्ध, शिख, ख्रिश्चन आणि पारसी अल्पसंख्याक येतात त्यांची कुणाला चिंता नाही. पण मोदी सरकारने त्यांचा विचार केला”.

“या अल्पसंख्याकांना भारतात नागरकित्व देण्यासाठी महात्मा गांधी, जवाहरलाला नेहरु, राजेंद्र प्रसाद, सरदार पटेलसह सर्व नेत्यांनी शब्द दिला होता.  ते नेतेही धार्मिक होते का असा प्रश्न शाह यांनी सभेत उपस्थित केला. काँग्रेसने मतांच्या राजकारण केलं. पण नरेंद्र मोदी 56 इंच छातीवाले आहेत. ते कुणाला घाबरत नाहीत”, असं शाह म्हणाले.