AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाहांना जे सुचवायचं होतं ते त्यांनी सुचवलं; पवार-शाह भेटीच्या वृत्तानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्याची सूचक प्रतिक्रिया

सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसून आता घालमेल बाहेर येत आहे. | Sharad Pawar Amit Shah

अमित शाहांना जे सुचवायचं होतं ते त्यांनी सुचवलं; पवार-शाह भेटीच्या वृत्तानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्याची सूचक प्रतिक्रिया
Amit Shah Sharad Pawar
| Updated on: Mar 28, 2021 | 3:51 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे चाणक्य अमित शाह (Amit Shah) यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त भेट झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजण्याची शक्यता आहे. कारण कालपर्यंत राष्ट्रवादीवर सडकून टीका करण्यात धन्यता मानणाऱ्या भाजपकडून सावध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. या सगळ्या घडामोडींवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (BJP leader Pravin Darekar on Sharad Pawar and Amit Shah meet)

ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगितले. महाविकासआघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसून आता घालमेल बाहेर येत आहे. केवळ नशीबाच्या जोरावर फार काळ सरकार चालवता येत नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

यावेळी प्रवीण दरेकर यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील शाब्दिक वादावादीचा दाखला दिला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हे सरकार आमच्या टेकूवर उभे आहे, असे सांगितले. तर अजित पवार यांनी महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नये, असे आपल्या मित्रपक्षातील नेत्यांना सुनावले आहे. या सगळ्यातून सरकारमधील अस्वस्थता समोर येत आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

‘अमित शाहांना जे सुचवायचं होतं ते त्यांनी सुचवलं’

प्रवीण दरेकर यांनी अमित शाहा यांच्या वक्तव्यावर फार काही बोलण्यास नकार दिला. अमित शाह आमचे शीर्षस्थ नेते आहेत. त्यांना काय सुचवायचं होतं ते त्यांनी सुचवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीची बातमी नाकारली आहे. त्यामुळे सस्पेन्स वाढल्याचे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

अमित शाहांची पवार-पटेलांशी गुप्त भेट?

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Amit Shah answers alleged meet with NCP Supreme Sharad Pawar at Ahmedabad)

राष्ट्रवादीने वृत्त फेटाळलं

अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला. संबंधित बातम्या :

VIDEO | सब चीजे सार्वजनिक नहीं होती, पवारांशी गुप्त भेटीच्या चर्चांवर अमित शाहांचं सूचक वक्तव्य

भाजप-राष्ट्रवादीत गुप्त चर्चा; अहमदाबादमध्ये शरद पवार-अमित शाह-प्रफुल पटेल यांची भेट?

शरद पवार अहमदाबादमध्ये अमित शाहांना भेटले का, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

(BJP leader Pravin Darekar on Sharad Pawar and Amit Shah meet)

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.