अंधारात रस्त्याच्या कडेला उभं राहून अमोल कोल्हेंची ‘मोबाईल’ सभा

अमोल कोल्हे यांनी मोबाईलवरुन सभा घेतल्यामुळे वक्ता चांदवड नाशिक, तर मतदार भोसरी आणि चिंचवडमध्ये, असा अभिनव प्रकार घडला.

अंधारात रस्त्याच्या कडेला उभं राहून अमोल कोल्हेंची 'मोबाईल' सभा


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोटोकॉलमुळे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या तीन सभा रद्द करण्यात आल्या. त्यानंतरही माघार न घेता अमोल कोल्हे यांनी मोबाईलवरुन सभा (Amol Kolhe Mobile Rally) घेतली. अंधारात रस्त्याच्या कडेला उभं राहून त्यांनी मोबाईलवरुन पलिकडील जनतेला संबोधित केलं.

अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत. पंतप्रधानांच्या सभेमुळे कोल्हेंना परवानगी नाकारली गेल्याने राष्ट्रवादीचे समर्थक काहीसे खट्टू झाले होते. परंतु कोल्हेंनी सभा घेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.

समोर श्रोते नसताना रस्त्याच्या कडेला उभं राहून सभा झाली. वक्ता चांदवड नाशिक, तर मतदार भोसरी आणि चिंचवडमध्ये, असा अभिनव प्रकार घडला.

‘पिंपरी चिंचवड आणि भोसरी याठिकाणी सभा नियोजित होत्या. परंतु ऐनवेळी पूर्वपरवानगी असतानाही एरंडोलमधून हेलिकॉप्टर उड्डाणासाठी परवानगी नाकारण्यात आली. मग औरंगाबाद येथे जाऊन चार्टर्ड विमानाने पुणे येथे येण्यासाठी प्रयत्न केला. पण आश्चर्य म्हणजे पंतप्रधान सर्किटमध्ये नसतानाही औरंगाबादची परवानगीही नाकारण्यात आली’ असा आरोप अमोल कोल्हेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून (Amol Kolhe Mobile Rally) केला आहे.

सत्ताधाऱ्यांच्या सभांचा विरोधकांना फटका, अमोल कोल्हेंसह धनंजय मुंडेंच्या सभा रद्द

एरंडोलवरुन ते पुण्याला यायला निघाले. चिंचवड आणि भोसरी या दोन्ही ठिकाणी शक्य झाल्यास लाईव्ह स्क्रीनिंग करु, असं सांगितलं. परंतु ‘डिजिटल इंडिया’च्या दैदिप्यमान यशामुळे शक्य झालं नाही, असा टोलाही अमोल कोल्हेंनी लगावला.

पंतप्रधान स्वत: राजकीय प्रचारासाठी पुण्यात आले होते. राजशिष्टाचारामुळे इतरांना प्रचारापासून वंचित राहावे लागत आहे, हे कितपत सयुक्तिक आहे. असा प्रश्न पडल्याचंही कोल्हे म्हणाले.

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI