सत्ताधाऱ्यांच्या सभांचा विरोधकांना फटका, अमोल कोल्हेंसह धनंजय मुंडेंच्या सभा रद्द

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या प्रचारसभांचा फटका विरोधी पक्षाच्या प्रचारसभांना बसताना दिसत आहे. आज (17 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचारसभांसाठी (PM Narendra Modi in Pune) विरोधीपक्षातील नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

सत्ताधाऱ्यांच्या सभांचा विरोधकांना फटका, अमोल कोल्हेंसह धनंजय मुंडेंच्या सभा रद्द

पुणे: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या प्रचारसभांचा फटका विरोधी पक्षाच्या प्रचारसभांना बसताना दिसत आहे. आज (17 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचारसभांसाठी (PM Narendra Modi in Pune) विरोधीपक्षातील नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारण्यात आली आहे. यात खासदार अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांच्या सभांचा समावेश आहे. या सभा रद्द करताना पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi in Pune) सुरक्षेचं कारण सांगण्यात आलं आहे. यावर विरोधकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान हे देशाच्या कामासाठी नाही, तर त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी विरोधकांच्या सभांना परवानगी नाकारणे योग्य नसल्याची भूमिका अमोल कोल्हे (Amol Kolhe public meeting cancelled) यांनी व्यक्त केली आहे.

अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. त्यांनी मागील काळात महाराष्ट्रभरात प्रचारसभांचा धडका लावला आहे. त्याला नागरिकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आजही त्यांच्या खेड, भोसरी, पिंपरी चिंचवड येथे सभा होत्या. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारण्यात आल्याने या सर्व सभा रद्द करण्यात आल्या. यावर अमोल कोल्हेंनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप उमेदवारांसाठी पुण्यात सभा होती. त्यांच्या ‘प्रोटोकॉलमुळे’ अमोल कोल्हे यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे कोल्हे यांच्या पिंपरी, चिंचवड, खेड, भोसरीतील सभा रद्द झाल्या. त्यामुळे पंतप्रधान मोदी भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले असताना त्यांच्या प्रोटोकॉलसाठी इतर पक्षांना प्रचारापासून रोखणे हे लोकशाहीच्या तत्वाला आणि मुल्यांना धरून नसल्याचं मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं.

अमोल कोल्हे भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुरस्कृत उमेदवारांसाठी खेड आणि पिंपरी-चिंचवड शहरात सभा घेणार होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे खेड, पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतील सभा रद्द झाली.

याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात कोल्हे यांनी म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली. परिणामी, माझ्या पाईट, भोसरी, चिंचवड आणि पिंपरीच्या सभा रद्द झाल्या आहेत. देशाचे पंतप्रधान एका पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी येत आहेत. अशावेळी त्यांच्या ‘प्रोटोकॉल’मुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवण्यात येत आहे. प्रचार करणे नाकारले जात आहे. हे लोकशाहीच्या तत्वाला आणि मुल्याला कितपत धरुन आहे?”

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI