‘तेरी जुबान कतरना बहुज जरुरी है’, शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानं अमोल मिटकरींचा चंद्रकात पाटलांवर निशाणा

| Updated on: Oct 17, 2021 | 3:53 PM

चंद्रकांत पाटील यांनी सांगतीली एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात येतेय.

तेरी जुबान कतरना बहुज जरुरी है, शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानं अमोल मिटकरींचा चंद्रकात पाटलांवर निशाणा
अमोल मिटकरी, चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगतीली एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात येतेय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका शायरीद्वारे चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. (MLA Amol Mitkari’s reply to Chandrakant Patil’s criticism of Sharad Pawar)

अमोल मिटकरी यांनी सुप्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांच्या शायरीद्वारे चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तेरी जुबान कतरना बहुत जरुरी है… ‘तुझे मर्ज है की तू बार-बार बोलता है!’ अशा शब्दात मिटकरी यांनी पाटलांवर टीका केलीय. शरद पवार हे जेव्हा संसदेत होते. त्यावेळी हे महाशय चड्डी आणि टोपीत होते, अशी टीकाही मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर केलीय.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी कीय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं पाटील म्हणाले होते.

त्यांची डोकी ठिकाणावर आहेत का? राऊतांचा खोचक सवाल

‘काल मी पाहिले महाराष्ट्र भाजपचे एक नेते शरद पवारांचा उल्लेख अरे-तुरे, एकेरी भाषेत करीत होते ही राज्याची परंपरा नाही आम्ही मोदी साहेबांचा उल्लेख किंवा अमित शाह यांच्याविषयी कधी असे बोलत नाही. अटलजी आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत. आडवाणी यांना आजही मानतो. आपल्यापेक्षा वय, अनुभव आणि विचारांनी मोठे असलेल्यांचा कायम आदर करावा. विचारांची लढाई विचारांनी करावी आणि पराभव करावा हे आम्हाला महाराष्ट्राने शिकवले…तुम्ही काल राजकारणात आलेली लोक शरद पवार यांचा उल्लेख एकेरी करता म्हणून मी म्हणतो यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणे गरजेचे…मेडिकल आणि नार्को पद्धतीने सुद्धा!’, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.

इतर बातम्या :

‘परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु’, रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर

अजित पवार यांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली की बहिणीशी बेईमानी केली? किरीट सोमय्यांचा सवाल

MLA Amol Mitkari’s reply to Chandrakant Patil’s criticism of Sharad Pawar