दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज, नवनीत राणा आणि रवी राणांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह

नवनीत राणा आणि रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला (Navneet Kaur Rana And Ravi Rana again tested covid positive) आहे.

दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज, नवनीत राणा आणि रवी राणांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Aug 18, 2020 | 5:24 PM

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालिकेकडून त्यांना पुढील 15 दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Amravati MP Navneet Kaur Rana And MLA Ravi Rana again tested covid positive)

नवनीत राणा यांना रविवारी (16 ऑगस्ट) रात्री लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांना शनिवारी (15 ऑगस्ट) रात्री लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (17 ऑगस्ट) पालिकेच्या डॉक्टरांकडून त्यांना कोरोना चाचणी करुन घेतली. त्यावेळी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती. पालिकेच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांकडून त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे.

नवनीत राणा यांना कोरोनाची लागण 

नवनीत कौर राणा यांना 6 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.  नवनीत राणा यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीला अमरावतीतील घरीच उपचार करण्यात आले. नंतर त्रास वाढल्याने त्यांच्यावर नागपुरातील वोकहार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नवनीत राणा यांना रस्तेमार्गे रुग्णवाहिकेतून मुंबईला आणले.

लीलावतीमध्ये दाखल केले त्यावेळी श्वासोच्छवास करताना त्रास आणि छातीदुखी होत असल्याची तक्रार नवनीत राणा यांनी केली होती.

नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात आधीपासूनच उपचार सुरु आहेत. आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. (Amravati MP Navneet Kaur Rana And MLA Ravi Rana again tested covid positive)

संबंधित बातम्या : 

खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण

खासदार नवनीत कौर राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील 20 दिवस क्वारंटाईन राहणार

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.