‘महाराष्ट्र संकटात असताना अमृता फडणवीसांना शेरोशायरी सुचते, त्यांची सत्तेची लालसा दिसून येते’

| Updated on: May 18, 2021 | 10:24 AM

आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झालं नसेल तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे. | Amruta Fadnavis

महाराष्ट्र संकटात असताना अमृता फडणवीसांना शेरोशायरी सुचते, त्यांची सत्तेची लालसा दिसून येते
अमृता फडणवीस
Follow us on

मुंबई: राज्यावर तौक्ते चक्रीवादळाचे संकट ओढावले असताना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) संवेदनशीलपणा दाखवण्याऐवजी राजकीय शेरोशायरी करतात. यामधून त्यांना असणारी सत्तेची लालसा दिसून येते. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीने संकटकाळात अशाप्रकारे वागणे योग्य नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. (NCP leader Umesh Patil take a dig at Amruta Fadnavis)

उमेश पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना अमृता फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झालं नसेल तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे. त्यामुळे त्या अस्वस्थतेतून शेरोशायरी करतात. अशा कठीण प्रसंगात सरकारवर संकट येईल अशी शेरोशायरी करण योग्य नाही, यावरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते. हे वर्तन माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीला न शोभणारे असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले.

क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही? अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्री ठाकरेंवर ट्विट

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

मुंबईत सोमवारी तौक्ते चक्रीवादळाचे थैमान सुरु असताना अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. ‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. आता अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायेच आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या राजकीय वादळाचा फटका कोणाला बसणार, महाराष्ट्रातील राजकारणावर त्याचे काय परिणाम होणार, असे काही प्रश्न अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे उपस्थित झाले होते.

रोहित पवार म्हणाले, तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवलात, आता अमृता फडणवीस म्हणतात..

संबंधित बातम्या:

नव्या राजकीय वादळाचे संकेत? मिसेस फडणवीसांचं सूचक ट्विट, म्हणाल्या…..

सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, कधी तरी आत्मचिंतन करा; फडणवीसांचा सरकारला सल्ला

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा; रुपाली चाकणकरांचा केंद्राला टोला

(NCP leader Umesh Patil take a dig at Amruta Fadnavis)