आंबेडकर स्मारक होत नसेल तर आम्हाला सांगा, वर्गणी काढून बांधू : आनंदराज आंबेडकर

"काही लोक उगाच स्मारकाच्या कामात अडथळा आणण्याचे काम करत आहेत," असेही आनंदराज आंबेडकर (anandraj ambedkar on aambedkar memorial) म्हणाले.

आंबेडकर स्मारक होत नसेल तर आम्हाला सांगा, वर्गणी काढून बांधू : आनंदराज आंबेडकर
Follow us
| Updated on: Jan 19, 2020 | 11:25 PM

मुंबई : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जर होत नसेल, तर आम्हाला सांगा. आम्ही वर्गणी काढून स्मारक बांधू,” असा टोला रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकरांना (anandraj ambedkar on aambedkar memorial) लगावला. “काही लोक उगाच स्मारकाच्या कामात अडथळा आणण्याचे काम करत आहेत,” असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.

“इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जो निधी देण्यात येणार आहे, तो निधी वाडिया रुग्णालयासाठी द्यावा,” असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. यावरुन आनंदराज आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला आहे.

“आंबेडकर स्मारक जर होत नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही वर्गणी काढून स्मारक बांधू. रस्त्यावर उतरु. आंदोलनामुळे, परिश्रमामुळे बाबासाहेबांचं स्मारक होतंय आणि सरकार म्हणतंय पैसे नाही. यासारखं दुर्देव नाही,” असेही आनंदराज आंबेडकर (anandraj ambedkar on aambedkar memorial)  म्हणाले.

“कोर्टाने सांगितलं की रुग्णालयांना द्यायला पैसे नाहीत. पण स्मारकासाठी आहेत. हे अत्यंत दुदैवी आहे. काही लोक उगीच स्मारकाच्या कामात अडथळा आणायचं काम करतायतं. त्याचा कुठलाच काहीच संबंध नाही,” असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.

“आम्ही 350 कोटीत स्मारक बांधण्याचा प्लान दिला. सरकारने त्याची किंमत 1 हजार कोटीच्या घरात नेली. एमएमआरडीएच्या कॉन्ट्रॅक्टरसोबत साटलोटं आहे. 100 कोटी कसे आणि कोणत्या कामासाठी दिले, याची सखोल चौकशी व्हायला हवी. दलाली कोण खातंय, चौकशी करा. असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले. स्मारक बांधता येत नसेल, तर आमच्याकडे द्या,” असेही ते (anandraj ambedkar on aambedkar memorial) म्हणाले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.