AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anandrao Adsul : ‘अमित शाह म्हणाले कृपा करुन…’, काय म्हणाले आनंदराव अडसूळ? VIDEO

Anandrao Adsul : "कुठल्यातरी बाईच्या घरी जायचं, तिथे पोळ्या लाटायच्या. अरे, तुझ्या घरी पोळ्या लाटना. तुझ्या घरी तू पोळी लाटली का? पोळी लाटून एकदा नवरा-मुलाला खाऊ घाल. या सगळ्या नाटकाची लोकांना भयंकर चीड आहे" असं आनंदराव अडसूळ म्हणाले.

Anandrao Adsul : 'अमित शाह म्हणाले कृपा करुन...', काय म्हणाले आनंदराव अडसूळ? VIDEO
Anandrao Adsul-Amit Shah
| Updated on: May 24, 2024 | 2:22 PM
Share

“मागची निवडणूक मी हरलो नाही, हरवलो गेलो. मी कोणाचे नाव घेणार नाही, पण योग्य वेळी घेईन” असं आनंदराव अडसूळ म्हणाले. “नवनीत राणांचा पराभव नक्की आहे. पाच वर्षात काम केलं नाही. त्यामुळे त्या हरणार” असं आनंदराव अडसूळ म्हणाले. नवनीत राणांवर त्यांनी खूप बोचरी टीका केली. “नवनीत राणा फक्त नाटकबाजी करतात. आदिवासी महिलांमध्ये जाऊन तिथे फेर धरायचा. दहीहंडीचा कार्यक्रम करायचा. एखाद्या कार्यक्रमाला अभिनेता आणायचा. हे काम लोकांना आवडणार नाही” असं आनंदराव अडसूळ म्हणाले.

“कुठल्यातरी बाईच्या घरी जायचं, तिथे पोळ्या लाटायच्या. अरे, तुझ्या घरी पोळ्या लाटना. तुझ्या घरी तू पोळी लाटली का? पोळी लाटून एकदा नवरा-मुलाला खाऊ घाल. या सगळ्या नाटकाची लोकांना भयंकर चीड आहे” असं आनंदराव अडसूळ म्हणाले. “यावेळी, जर मी त्या ठिकाणी निवडणूक लढलो असतो, तर 100% जिंकून आलो असतो. नाटकबाजी पाहिल्यानंतर लोकांमध्ये संताप होतो” असं आनंदराव अडसूळ म्हणाले. ‘ईडीसुद्धा माझ्या मागे लावून दिली’

“मुस्लीम माझ्याकडे आले आणि बोलले की तुम्ही कुठल्याही पक्षाकडून लढा, आम्ही तुम्हाला निवडून आणणार” असा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला. “अमित शाहा म्हणाले की, तुम्ही यावेळी कृपा करून लढू नका. ही जागा मला हवी आहे” असा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला. “मला मानसिक त्रास झाला, शारीरिक त्रास झाला. ईडीसुद्धा माझ्या मागे लावून दिली. त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता. अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिले असून मी त्याची वाट पाहत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे माझ्या मनात आहे” असं आनंदराव अडसूळ म्हणाले.

Follow Us
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा
धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; ठाकरेंचा मोठा दावा
मोठी बातमी! धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर...
CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे थेट आदेश...
आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
Ajit Doval Speech | आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?
Uddhav Thackeray | झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली...
Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा