“देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की…”, सचिन वाझेंच्या आरोपावर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

न्यायमूर्ती चांदिवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची ११ महिने चौकशी केली. यानंतर त्यांनी हा चौकशी अहवाल दोन वर्षांपूर्वी सरकारला दिलेला आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की..., सचिन वाझेंच्या आरोपावर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 10:59 AM

Anil Deshmukh First reaction : बडतर्फ पोलिस अधिकारी असलेले सचिन वाझे यांच्या आरोपामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. त्यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत” असा आरोप सचिन वाझे याने केला होता. त्यावर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विनंतीही केली आहे.

अनिल देशमुख यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी सचिन वाझे प्रकरणीही भाष्य केले. “काल देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेचा आधार घेत माझ्याविरोधात पुन्हा एकदा आरोप करण्यास सांगितले. सचिन वाझे हा एक दहशतवादी असून त्याच्यावर दहशतवादी कट रचल्याप्रकरणी आणि दोन खून केल्याचे आरोप आहेत. सध्या तो जेलमध्ये आहे. अशा सचिन वाझेचा उपयोग देवेंद्र फडणवीसांना माझ्याविरोधात आरोप करण्यासाठी घ्यावा लागतो, ही खूप शरमेची बाब आहे”, असे अनिल देशमुख म्हणाले.

अनिल देशमुखांचा आरोप

“सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांना माझ्यावर आरोप करायला लावले. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन तीन वर्षांपूर्वी हेच आरोप केले होते, जे त्यांनी काल केले. त्यावेळी मी स्वत: मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की, माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करावी. मी विनंती केल्यानुसार, त्यावेळी सरकारने माझी चौकशी करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती चांदिवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची ११ महिने चौकशी केली. यानंतर त्यांनी हा चौकशी अहवाल दोन वर्षांपूर्वी सरकारला दिलेला आहे.

तो अहवाल सध्या गृहखात्याकडे आहे. मी याबद्दल वारंवार मागणी करत आहे की माझ्या चौकशीचा हा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा. तो अहवाल १४०० पानांचा आहे. मी वारंवार याबद्दल मागणी करत आहे. पण तरीही तो अहवाल राज्य सरकार जनतेसमोर आणत नाही”, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

“तो अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणा”

त्यामुळे “आता मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, तुमच्या गृह विभागाकडे असलेला तो अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा”, असे अनिल देशमुखांनी म्हटले.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.