AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Waikar : शिवसेनेचा आणखी एक आमदार नॉटरिचेबल, सत्ता गेल्यानंतरही धक्क्यांवर धक्के? की अफवा?

शिवसेनेचा आणखी एक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार रवींद्र वायकर नॉटरिचेबल आहेत. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचं सरकार आल्यास वायकर यांनी मंत्रीपद मिळतं का, असी चर्चा होती. ऐन सत्तास्थापनेच्यावेळी रवींद्र वायकर गायब झाल्यानं त्यांना शिंदे गटानं मंत्रीपदाची ऑफर दिल्याचं बोललं जातं होतं. पण ते गावी असल्याची महिती आहे.

Ravindra Waikar : शिवसेनेचा आणखी एक आमदार नॉटरिचेबल, सत्ता गेल्यानंतरही धक्क्यांवर धक्के? की अफवा?
Ravindra WaikarImage Credit source: social
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jun 30, 2022 | 12:44 PM
Share

मुंबई : शिवसेनेचा आणखी एक आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) नॉटरिचेबल आहेत. रवींद्र वायकर शिंदे गटात सामील होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली होती. मात्र, ते गावी गेल्याची माहिती आहे. आधीच राज्याच्या राजकारणात अस्थिर परिस्थिती असून शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार पडलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामुळे शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यामुळे गेलेली सत्ता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) चांगलीच जिव्हारी लागली आहे. यातच आता पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार वायकर नॉटरिचेबल असल्यानं ते नेमके कुठे गेले, हे कळायला मार्ग नव्हता. दरम्यान, यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का बसल्याचंही मानलं गेलं. दरम्यान, ते गावी गेल्याची माहिती आहे.

वायकरांना मंत्रीपदाची ऑफर असल्याचंही बोललं गेलं

एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष 11 अशा एकूण 51 आमदारांचं बळ आहे. त्यामध्ये आता वायकर देखील शिंदे गटात गेल्याची सूत्रांची माहिती होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचं सरकार आल्यास वायकर यांनी मंत्रीपद मिळतं का, असेही प्रश्न चर्चेत होते. ऐन सत्तास्थापनेच्यावेळी रवींद्र वायकर गायब झाल्यानं त्यांना शिंदे गटानं मंत्रीपदाची ऑफर दिल्याचं बोललं जातं होतं. मात्र, ते गावी असल्याची माहिती आहे.

सत्तेचा नवा फॉर्म्यूला काय?

बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून सरकार बनवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी सत्तेचा फॉर्म्यूला देखील बनला असल्याचं सूत्रांच्या माध्यमातून समोर आलंय. दरम्यान, सत्तास्थापनेच्या ऐन तोंडावर रवींद्र वायकर गायब झाल्यानं त्यांनी मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्या अफवा असल्याची माहिती  आहे. दरम्यान, नव्या सरकारचा फॉर्म्यूला काय आहे. हे जाणून घ्या..

सत्तेच्या नव्या फॉर्म्यूल्यात शिंदे गटाला काय?

  1. शिंदे गटाला भाजपची ऑफर
  2. उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिदेंना
  3. आठ आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद
  4. पाच आमदारांना राज्य मंत्रीपद

सत्तेच्या नव्या फॉर्म्यूल्यात भाजपला काय?

  1. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद
  2. भाजपचे 29 आमदार मंत्री बनतील
  3. अपक्ष आमदारांनाही मंत्री पदे

अडचणी वाढतायत

राज्याच्या राजकारणात अस्थिर परिस्थिती असून शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार पडलंय. एकनाथ शिंदे गटामुळे शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यामुळे गेलेली सत्ता उद्धव ठाकरेंच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यातच आता पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार वायकर नॉटरिचेबल असल्यानं ते नेमके कुठे गेले, हे कळायला मार्ग नव्हता . दरम्यान, यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का बसल्याची बोललं गेलं. दरम्यान, ते गावी गेल्याची माहिती आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा