“ठाण्यात आपल्याविरोधात लोक उभं राहाणं एकनाथ शिंदेंना रुचलं नाही, म्हणून उद्रेक”, ठाकरे गटाची सडकून टीका

खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

ठाण्यात आपल्याविरोधात लोक उभं राहाणं एकनाथ शिंदेंना रुचलं नाही, म्हणून उद्रेक, ठाकरे गटाची सडकून टीका
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 11:00 AM

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. माझ्याच विधानसभा मतदारसंघातील लोक माझ्या विरोधात उभे राहतात, हे झोंबल आहे. म्हणून ही प्रतिक्रिया आली. म्हणून हा उद्रेक झालाय, असं म्हणत अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, म्हणून अशी प्रतिक्रिया येत आहे, असंही ते म्हणालेत.

एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाण्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. ठाण्यातील किसननगर भागात दोन गटातील नेत्यांमध्ये राडा झाला. आधी भटवाडीत हाणामारी झाली. नंतर श्रीनगर पोलीस स्टेशन बाहेरही राडा झाला. यावर अरविंद सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अंधेरी पोट निवडणुकीवर सावंत म्हणाले…

अंधेरी पोट निवडणुकीसाठी मिंदे गट निवडणूक आयोगाकडे गेला. पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं गेलं. मात्र निवडणूक लढवलीच नाही. ते धाधांत खोटं बोलले. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात गेलो. चिन्ह आणि नाव आम्हाला परत मिळालं पाहिजे म्हणून याचिका केली, असं सावंत म्हणालेत.

एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री बैठक झाली. त्यावरही सावंत बोलले. शिंदे-फडणवीस यांना अशा उशीरा बैठकींची सवय आहे. वेशांतर करून त्यांनी ठाकरे सरकार पाडलं आणि सत्तेत बसले. हे फडणवीसांनीच विधीमंडळात सांगितलंय, माजी मुख्यमंत्री म्हणाले होते मला बदला घ्यायचा आहे, त्यांनी तसं केलं. त्यातून महाराष्ट्राला कळालं की ते सूडाची मूर्ती आहेत, असं अरविंद सावंत म्हणालेत.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.