शिंदे गटाला काय माहिती निष्ठा, भूलथापा देतायत खावून…; अरविंद सावंतांची खालच्या पातळीवर टीका

सध्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार शाद्बिक चकमक सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. शिंदे गटावर टीका करताना शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे.

शिंदे गटाला काय माहिती निष्ठा, भूलथापा देतायत खावून...; अरविंद सावंतांची खालच्या पातळीवर टीका
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 1:26 PM

मुंबई : सध्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना (Shiv sena) आणि शिंदे गटात जोरदार शाद्बिक चकमक सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आमच्याच दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होणार असा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप देखील सुरू आहेत. आज मात्र शिंदे गटावर टीका करताना शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी खालच्या पातळीवर टीका केल्याचं पहायला मिळालं. त्यांनी ट्विट (tweet) करत शिंदे गटावर निशाणा साधला. ‘शिंदे गटाला काय माहिती निष्ठा, भुलथापा देतायेत खावून विष्ठा, एकीकडे निष्ठेचा दसरा तर दुसरीकडे लाचार बेईमान आणि कचरा’ अशा शद्बात अरविंद सावंत यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

अरविंद सावंत यांचं ट्विट

अरविंद सांवत यांनी ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ‘एक तरफ लाचार एक तरफ सदाचार, एक तरफ बेईमान एक तरफ निष्ठावान, एक तरफ दसरा एक तरफ कचरा, बिके हुये क्या जाने निष्ठा गुमराह कर रहे खाकर विष्ठा !’ असं ट्विट अरविंद सावंत यांनी केलं आहे. अरविंद सावंत यांच्या या टीकेनंतर दसरा मेळाव्यारून पुन्हा एकदा राजकारण तापण्याचे चिन्ह आहे.

हे सुद्धा वाचा

दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

यंदा दोन्ही गटाने दसरा मेळाव्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आपल्याच मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी झाली पाहिजे यासाठी शिवसेना अणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दसरा मेळाव्याला जमलेली गर्दीच सांगेल खरी शिवसेना कोणती अशी वक्तव्य देखील अनेकदा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहेत.  आज अरविंद सावत यांनी देखील याच पार्श्वभूमीवर हे ट्विट केलं आहे. यानंतर शिंदे गट आता टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.