AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुष्यबाण चिन्ह गेलं तर उद्धव ठाकरेंच्या ‘प्लॅन बी’ बाबत निलेश राणे काय म्हणतात?

भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे बोगस माणूस आहे. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना रसातळाला नेली, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

धनुष्यबाण चिन्ह गेलं तर उद्धव ठाकरेंच्या 'प्लॅन बी' बाबत निलेश राणे काय म्हणतात?
| Updated on: Oct 01, 2022 | 12:44 PM
Share

मुंबई : भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेना (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे बोगस माणूस आहे. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना रसातळाला नेली. आता उरलीसुरली शिवसेना देखील उद्धव ठाकरे वाचवू शकणार नाहीत, असा घणाघात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.धनुष्यबाण  चिन्ह गेलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठलाही ‘प्लॅन बी’ नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे हे आता राहिलेली शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र धनुष्यबाण चिन्ह गेलं तर यातील किती आमदार त्यांच्यासोबत राहातील याबाबत शंका असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. राणेंच्या या टीकेला शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आमदार वाचवण्यासाठी धडपड

‘उद्धव ठाकरेंची सेना आता रसातळाला जाणार त्यांना आता कोणी वाचू शकत नाही. त्याचं भविष्य ठरलेलं आहे. ते उद्धस्त होणार, आज बाळासाहेबांचा पक्ष 15 आमदारांचा पक्ष करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आता ते 15 आमदाराही राहातील की नाही याबाबत शंका आहे. उद्धव ठाकरेंकडे कोणताही मास्टर प्लॅन नाही, उद्धव ठाकरे हे बोगस माणूस आहेत, सध्या शिवसेनेमध्ये जे आमदार आहेत ते वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

गुलाबराव पाटलांचाही टोला

तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. धनुष्यबाण चिन्ह गेल्यास उद्धव ठाकरे यांना पाच आमदारांचा पाठिंबा देखील राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.