…तर उद्धव ठाकरेंकडे 5 आमदारही उरणार नाहीत; गुलाबराव पाटलांचा पुन्हा घणाघात

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

...तर उद्धव ठाकरेंकडे  5 आमदारही उरणार नाहीत; गुलाबराव पाटलांचा पुन्हा घणाघात
अजय देशपांडे

|

Oct 01, 2022 | 9:09 AM

मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पुन्हा एकदा शिवसेना (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. धनुष्यबाण चिन्ह गेल्यास उद्धव ठाकरे यांना पाच आमदारांचा देखील पाठिंबा राहणार नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येणार असल्याचं ऐकतोय असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मला कुत्र हे चिन्ह दिलं तरी मी निवडून येईल असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. जर धनुष्यबाण चिन्ह गेलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच आमदार देखील राहणार नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. चंपासिंग थाप हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी घातलं, ते चंपासिंग थापा देखील यांना सोडून आले. आता मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येणार असल्याचं एकतो आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर

शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरूच आहे. शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यामध्ये प्रताप सरनाईक यांचा मुलागा पूर्वेश सरनाईक यांना स्थान देण्यात आलेले नाही. हा प्रताप सरनाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. या कार्यकारिणीमध्ये दादा भुसे, अर्जुन खोतकर, सदा सरवणकर यांच्या मुलाची वर्णी लागली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें