शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर; ‘या’ नेत्यांच्या मुलांना संधी

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर सातत्याने शिंदे गटाकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता युवासेनेची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली आहे.

शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर; 'या' नेत्यांच्या मुलांना संधी
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 8:24 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shiv Sena) उठाव केल्यानंतर सातत्याने शिंदे गटाकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक शहरात शिंदे गटाकडून नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात येत आहे. याद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर (Uddhav Thackeray) आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये दादा भुसे, अर्जुन खोतकर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मात्र आमदार प्रताप सरनाईक यांना धक्का देण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांना युवासेनेत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे.

कोणाच्या मुलांना संधी?

शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये दादा भुसे, अर्जुन खोतकर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. मात्र या यादीमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांच्या नावाचा समावेश नाहीये. हा प्रताप सरनाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

सरनाईकांविरोधात जनहित याचिका

दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. भूखंड हडपल्याचा आरोप करत ठाणेकरांच्या वतीने प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर तीन ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दफनभूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडपल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.