देशाच्या फाळणीला मुस्लीम जबाबदार नाहीत, मोदीजी… स्वातंत्र्य लढ्यात आमचाही वाटा, ते बलिदान आठवा- असदुद्दीन ओवैसी

भारत पाकिस्तान फाळणीला भारतातली मुस्लीम जबाबदार नाहीत, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत.

देशाच्या फाळणीला मुस्लीम जबाबदार नाहीत, मोदीजी... स्वातंत्र्य लढ्यात आमचाही वाटा, ते बलिदान आठवा- असदुद्दीन ओवैसी
आयेशा सय्यद

|

Aug 13, 2022 | 1:01 PM

नवी दिल्ली : असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचं एक भाषण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात स्वातंत्र्यांच्या (Independence Day) पंचाहत्तरीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत आहेत. भारत पाकिस्तान फाळणीला भारतातली मुस्लीम जबाबदार नाहीत. ज्यांचं पाकिस्तानवर प्रेम ते तेव्हाच तिकडे गेले. जे मुस्लीम भारतात आहेत त्यांचं देशावर विशेष प्रेम आहे. त्यावर कुणी शंका घेऊ नये. देशाच्या फाळणीला मुस्लीम जबाबदार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, स्वातंत्र्य लढ्यात आमचाही वाटा आहे. मुस्लीमही देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेत. त्यांचं ते बलिदान आठवा”, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत. काल रात्री एमआयएमच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिमांच्या महान योगदानाचा गौरव करण्यासाठी जाहीर सभा घेण्यात आली होती. तेव्हा ओवैसी बोलत होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेने केली. आता सांगा भारतावर खरं प्रेम कुणाचं आहे?, असा सवाल ओवैसींनी विचारला आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त एकच आवाहन करू इच्छितो, चला आपण एकत्र येऊयात गरिबांच्या कल्याणासाठी… होणाऱ्या जुलमाविरोधात एकत्र येऊयात, एकमेकांचा हात हातात घेऊन पुढे जाऊयात.. कारण आपल्या देशाला पुढे घेऊन जायचंय, असं आवाहन ओवैसींनी केलंय.

ते योगदान कसं विसरावं?

1947 च्या युद्धात आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. याआधीही अनेक लढाया झाल्या, ज्यात मोठ्या संख्येने लोकांचे प्राण गेले. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांना कसे विसरता येईल? 1857 मध्येही युद्ध झालं होतं. याशिवायही अनेक युद्धं झाली. या देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लीम धर्माच्या लोकांचंही मोठं योगदान आहे. सिराज-उद-दौला आणि टिपू सुलतान यांचं बलिदान आपण कसं विसरता येईल, असं ओवैसी म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

ओवैसी म्हणतात…

स्वातंत्र्यांच्या पंचाहत्तरीच्या पार्श्वभूमीवर औवैसी बोललेत. भारत पाकिस्तान फाळणीला भारतातली मुस्लीम जबाबदार नाहीत. ज्यांचं पाकिस्तानवर प्रेम ते तेव्हाच तिकडे गेले. जे मुस्लीम भारतात आहेत त्यांचं देशावर विशेष प्रेम आहे. त्यावर कुणी शंका घेऊ नये. देशाच्या फाळणीला मुस्लीम जबाबदार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, स्वातंत्र्य लढ्यात आमचाही वाटा आहे. मुस्लीमही देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेत. त्यांचं ते बलिदान आठवा”, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें