भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहरामपाडा म्हटलं की ‘मातोश्री’ला त्रास : आशिष शेलार

भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला (Silver oak) त्रास आणि बेहरामपाडा म्हटलं की 'मातोश्री'ला (Matoshree) त्रास होतो, असा निशाणा आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी साधला.

भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहरामपाडा म्हटलं की 'मातोश्री'ला त्रास : आशिष शेलार
Sharad pawar And Ashish Shelar
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 7:01 PM

मुंबई : विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar book) यांच्या वर्षभराच्या लेखाजोखाचं प्रकाशन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झालं. यावेळी भाजप आमदार आशिष शेलार, गिरीश महाजन, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित होते. मुंबईतील या सोहळ्यात भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. (Ashish Shelar attacks Sharad Pawar and Uddhav Thackeray)

“भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला (Silver oak) त्रास आणि बेहरामपाडा म्हटलं की ‘मातोश्री’ला (Matoshree) त्रास होतो, असा निशाणा भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी साधला. सिल्व्हर ओक हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान तर ‘मातोश्री’ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे.

भेंडीबाजार आणि बेहराम पाडा ही दोन्ही ठिकाणं मुस्लिम वस्ती म्हणून परिचीत आहे. त्यावरुनच आशिष शेलार यांनी प्रविण दरेकरांच्या भाषणाचा धागा पकडत, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

“जो जनतेसाठी काम करतो, तोच जनतेसमोर त्या कामाची मांडणीही ठासून करु शकतो. प्रविण दरेकरांनी जास्तवेळ विरोधी पक्षनेते राहू नये एवढीच इच्छा. देवेंद्रजी हे राजकारणातले कृष्ण आहेत. आता मात्र सुदर्शन चक्र काढावेच लागेल. ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातूनच काढा”, असं आशिष शेलार म्हणाले.

भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहराम पाडा म्हटलं की मातोश्रीला त्रास होतो. दरेकरांनी काढला लेखाजोखा, पण त्यांचं आपलं अजूनही तेच माझ्या लेकाला जपा, असं म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे कुटुंबीयांवर जोरदार हल्ला केला.

प्रविण दरेकर काय म्हणाले?

या कार्यक्रमात प्रविण दरेकर यांनीही भाषण करुन, शरद पवारांवर निशाणा साधला. “महाराष्ट्राचे जाणते नेते असं बोलले की काय तर मला वाईट वाटतं म्हणे की मी पण कधी विरोधी पक्षनेता होतो. मी शरद पवारांना पत्र पाठवलं आणि हो, लेखाजोखाही पाठवतोय. आता ते बघून तरी त्यांना माझी लाज वाटणार नाही.

ते बघून तरी त्यांनी असंच खुल्या दिलानं कौतुक करावं. शरद पवारांना फक्त भेंडीबाजार झोंबलं”, असं प्रविण दरेकर म्हणाले.

मी देवेंद्रजींना कधीच काही मागितलं नाही. न सांगता, न मागता आमदार केलं आणि तसंच विरोधी पक्षनेता ही बनवलं, जबाबदारी दिली. मी माझ्या नेत्याला, पक्षाला आणि जनतेला उत्तर द्यायला जबाबदार आहे. ज्यावेळी जंगलात वादळ आलं होतं तेव्हा जंगलातले वाघ बिळात बसले होते, तेव्हा प्रविण दरेकर, देवेंद्र फडणवीस सगळीकडे वादळाचा सामना करत फिरत होतो, असा हल्लाबोल दरेकरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला.

शरद पवार दरेकरांना काय म्हणाले होते?

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमने-सामने आले होते. दिल्लीत जे आंदोलन पेटलंय ते शेतकरी नाहीतच, असा दावा करणाऱ्या दरेकरांच्या वक्तव्याचा शरद पवार यांनी जोरदार समाचार घेतला होता. प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे. कारण, एकेकाळी मीदेखील विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, असं पवार म्हणाले होते.

शेतकरी आंदोलनाबाबत दरेकर काय म्हणाले होते?

दिल्लीत जे आंदोलन पेटलंय ते शेतकरी करूच शकत नाही. शेतकरी असं आंदोलन पेटवूच शकत नाहीत. लोकांच्या पोटाची भूक भगावणारा शेतकरी आंदोलन पेटवण्याची भाषा करूच शकत नाही. आंदोलन पेटवूच शकत नाही. काही देशविघातक शक्ती या आंदोलनामागच्या बोलवित्या धनी आहेत, शेतकरी मोर्चात भेंडी बाजारमधील भगिनी कशा? हे केवळ एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. मी आधार असलेलं वक्तव्य केलेलं आहे, कोणाच्या सांगण्यावरून बोललो नाही”, असं दरेकर म्हणाले होते.

(Ashish Shelar attacks Sharad Pawar and Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या  

शेतकरी आंदोलनावरुन प्रवीण दरेकर-शरद पवार आमनेसामने, पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर… 

शेतकऱ्यांविषयी ‘तो’ प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला, म्हणाले…

आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका; त्यांची संपत्ती जप्त करा: कंगना रनौत

भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी?, आंदोलनात लोकं घुसवली; प्रवीण दरेकरांची टीका

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.