AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची एकाकी झुंज

नांदेड : नांदेड मतदार संघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिलला होणार आहे. मतदानासाठी अवघा एक आठवडा शिल्लक आहे. मात्र, नांदेडमध्ये काँग्रेस प्रचारात एकाकी पडलेली दिसत आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या प्रचाराची धुरा अशोक चव्हाण एकटे सांभाळत असल्याचं चित्र आहे. प्रमुख मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी काँग्रेसच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नांदेडमध्ये केवळ […]

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची एकाकी झुंज
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

नांदेड : नांदेड मतदार संघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिलला होणार आहे. मतदानासाठी अवघा एक आठवडा शिल्लक आहे. मात्र, नांदेडमध्ये काँग्रेस प्रचारात एकाकी पडलेली दिसत आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या प्रचाराची धुरा अशोक चव्हाण एकटे सांभाळत असल्याचं चित्र आहे. प्रमुख मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी काँग्रेसच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नांदेडमध्ये केवळ नावापुरतीच उरली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाला 11 एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-स्वाभिमानी शेतकरी संघटना-शेतकरी कामगार पक्ष-युनायटेड जनता दल- पीपल्स रिपब्लिकन पार्टी या प्रमुख पक्षांची महाआघाडी लोकसभेसाठी मैदानात आहे. मात्र नांदेडमध्ये खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाण यांना एकाकी झुंज द्यावी लागत आहे. महाआघाडीचे  राज्यपातळीवरचे धनंजय मुंडे सोडले, तर अद्याप कुणीच चव्हाण यांच्या प्रचाराला आलेलं नाही. त्यातच प्रमुख सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे.

बापूसाहेब गोरठेकर, कमलकिशोर कदम, आमदार प्रदीप नाईक, किशोर देशमुख, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे , दिनकर दहिफळे, बाबू खा पठाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते काँग्रेसच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपण काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यातच अन्य मित्र पक्षाचा कुठलाही नेता नांदेडकडे अद्याप फिरकलाही नाही.

अशोक चव्हाण यांच्या एकाकी झुंजीला बहुजन वंचित आघाडीचा मोठा फटका बसेल असं चित्र आहे. तळपत्या उन्हात लोक प्रकाश आंबेडकर यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. आंबडेकरांच्या पक्षाला लोक पाठबळही देत आहेत. अनेक सार्वजनिक भीम जयंती उत्सव मंडळांनी कधी नाही ते यावेळी आपले कार्यक्रम रद्द करत जमा झालेला निधी वंचित आघाडीला दिला. त्यामुळे पैशांअभावी वंचित असलेल्या आघाडीला आर्थिक पाठबळ मिळत असल्याने वंचित आघाडीचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यातच आगामी काळात एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्या सभांचेही नांदेडमध्ये नियोजन केलं जातं आहे. दुसरीकडे भाजपही यावेळी खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रिगंणात उतरली आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.