मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होऊ शकतं, जॅमर बसवा : अशोक चव्हाण

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने या क्षेत्रात मोबाईल जॅमर बसवावे, अशीही मागणी त्यांनी केली. याबाबत त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. चव्हाण म्हणाले, “राज्यातील मतदान प्रक्रिया झाली आहे. मात्र, मोबाईल टॉवरद्वारे ईव्हीएम मशिन टेम्परिंग होऊ शकते. […]

मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होऊ शकतं, जॅमर बसवा : अशोक चव्हाण
Follow us

मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने या क्षेत्रात मोबाईल जॅमर बसवावे, अशीही मागणी त्यांनी केली. याबाबत त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

चव्हाण म्हणाले, “राज्यातील मतदान प्रक्रिया झाली आहे. मात्र, मोबाईल टॉवरद्वारे ईव्हीएम मशिन टेम्परिंग होऊ शकते. त्यामुळे मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या क्षेत्रात मोबाईल जॅमर लावावा. यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांनाही भेटले आहे.”

राज्याच्या माजी मुख्य निवडणूक अधिकारी नीला सत्यनारायण यांनी देखील निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित केल्याचा दावा चव्हाण यांनी केला. तसेच 50 टक्के VVPAT स्लिपची मोजणी करण्याचीही मागणी केली. आपल्या शंकांबद्दल निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांच्याकडे तक्रार केल्याचीही माहिती चव्हाण यांनी दिली.

‘रामटेक येथील सीसीटीव्हीचे रेकॉर्डींग करणारे डीव्हीआर चोरी’

रामटेक येथे सीसीटीव्हीचे रेकॉर्डींग करणारे डीव्हीआर डिव्हाईस चोरीला गेल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून एफआयआर नोंदवल्याचेही ते म्हणाले.

‘भाजपला आपला पराभव दिसू लागला आहे’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल जे वक्तव्य केले, त्याचा अशोक चव्हाण यांनी निषेध केला. तसेच पंतप्रधानांनी प्रचाराचा स्तर खाली नेल्याचा आरोप केला. भाजपला आपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी लोकशाहीला घातक विधाने करत असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.

‘आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी’

राज सरकारच्या धोरणांना लक्ष्य करताना त्यांनी 1500 कोटींचा बॉण्ड काढणे म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती खिळखिळे करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले. तसेच मराठा आरक्षणासह इतर आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचाही आरोप चव्हाण यांनी केला. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही प्रश्न त्यामुळेच उपस्थित होत असल्याचेही ते म्हणाले.


Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI