दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही; अस्लम शेख यांची टोलेबाजी

दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही; अस्लम शेख यांची टोलेबाजी
aslam shaikh

दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

Nupur Chilkulwar

|

Oct 15, 2020 | 9:42 PM

मुंबई : दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही, (Aslam Shaikh Criticize Modi Govt) असं म्हणत वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत असल्याचंही ते म्हणाले (Aslam Shaikh Criticize Modi Govt).

मिशन बिगिन अगेन महाराष्ट्रमध्ये जशी आवश्यकता लागेल, तसे तसे आपण सुरु करत आहोत. दुकानं सुरु केली. मॉल उघडले रेस्टॉरंट सुरु केले. बसेस सुरु केल्या, ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी वाढवल्या आहेत. आता जनतेचा दबाव आहे की, ट्रेन सुरु कराव्यात. पण, मला सांगायचं वाटतं की अजूनही जगात, देशात आणि राज्यातील कोरोना गेलेला नाही. पण, बसेस आणि ट्रेनमध्ये फरक आहे. एका बसमधून 50 प्रवासी प्रवास करतात, तर ट्रेनमध्येही मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात.

हे सर्व टाळण्यासाठी आम्ही एक टास्क फोर्स तयार केली आहे. त्यानुसारच आम्ही एकेक टप्प्यानुसार निर्णय घेत आहोत. दिल्लीत रात्रीबेरात्री निर्णय घेतले जातात. तशा पद्धतीने आम्ही महाविकासआघाडी निर्णय घेत नाही. सर्वसामान्य जनतेच्या हिताचं आम्ही निर्णय घेत आहोत.

Aslam Shaikh Criticize Modi Govt

संबंधित बातम्या :

मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, ग्रंथालयेही सुरु, शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच!

जलयुक्त शिवाराचा फक्त बोलबाला; अनिल देशमुखांचा भाजपला खोचक टोला

ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें