मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे भाजपला 3 सवाल, तिन्ही प्रश्नांची उत्तरं…..

भाजपनं राजकीय अजेंडा चालवण्यासाठी लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळू नये, असा इशारा अस्लम शेख यांनी दिला. (Aslam Shaikh slams BJP leaders for politicize Chhat puja issue)

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे भाजपला 3 सवाल, तिन्ही प्रश्नांची उत्तरं.....
aslam shaikh
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 4:49 PM

मुंबई : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी छटपूजेवरुन आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपनं राजकीय अजेंडा चालवण्यासाठी लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळू नये, असा इशारा अस्लम शेख यांनी दिला. कोरोना विषाणू संसर्गावरुनही अस्लम शेख यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. (Aslam Shaikh slams BJP leaders for politicize Chhat puja issue)

अस्लम शेख यांनी छटपूजेवरुन आक्रमक होणाऱ्या भाजप नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. “मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारायचे आहे की त्यांनी देशाला कोरोना व्हायरसपासून मुक्त केले आहे का? कोरोनावर कोणतीही लस सापडली आहे का? देशात गोष्टी सामान्य झाल्या आहेत का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जर ‘नाही’ असतील, तर फक्त ते राजकीय अजेंडा चालवत आहेत. भाजपचे नेते लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून उघडपणे आपली कमकुवत विचारसरणी दाखवत आहेत”, अशी टीका अस्लम शेख यांनी केली.

अस्लम शेख यांनी भाजप नेत्यांना जनतेची काळजी नसल्याचे टीकास्त्र सोडले. कोरोनामुळं दिल्लीत निर्माण झालेली परिस्थिती भाजप नेत्यांनी पाहिली आहे का? फ्रान्समध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय, भाजपनं याचा विचार केला पाहिजे, असं अस्लम शेख म्हणाले.

भाजप राजकारणासाठी लाखो लोकांच्या आयुष्याशी खेळत आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून धार्मिक स्थळं उघडण्यासाठी भाजपनं धार्मिक अजेंडा चालविला होता. मात्र, राज्य सरकारनं कार्यपद्धती ठरवून धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी दिली आहे.  भाजपकडून आजी छटपूजेसंदर्भात राजकारण केले जात आहे. कोरोना संक्रमण काळात येणारे सर्व सण सर्व धर्मातील लोकांनी शांततेत साजरे केले. छटपूजेसंदर्भातील निर्णयाला विरोध करुन भाजपला लोकांमध्ये धर्माबद्दल गोंधळ का निर्माण करायचा आहे?, असा सवाल अस्लम शेख यांनी विचारला.

अस्लम शेख यांनी आजच्या काळात कोरोना संसर्गाविरुद्ध लढणे आणि त्याला पराभूत करणे हे आमचे प्राधान्य असले पाहिजे, असं म्हटलं. भाजप नेत्यांनी धर्माच्या आधारे समाजात विष पेरण्याचे काम थांबवावे, असं शेख यांनी ठणकावले आहे. (Aslam Shaikh slams BJP leaders for politicize Chhat puja issue)

छटपूजेवर मुंबई महापालिकेची बंदी

छटपूजेच्या उत्सवानिमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी नागरिक समुद्र किनारी, तलावाच्या काठी किंवा नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर तसेच कोविडची दुसरी लाट येणाची असलेली शक्यता लक्षात घेऊन, तसेच समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी छटपूजा विषयक कार्यक्रमांचे आयोजन केल्यास शारीरिक अंतराचे पालन याबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने 20 व 21 नोव्हेंबर 2020 रोजी येत असलेल्या छटपूजा विषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणाऱ्या आयोजनांवर नाईलाजाने प्रतिबंध घालण्यात येत आहे, अशी भूमिका मुंबई महापालिकेने घेतली आहे.

भाजप नेते भातखळकर आक्रमक

राज्य सरकारने मंदिरे उशिरा उघडली आणि आता छटपूजेलाही परवानगी नाकारली आहे. हे सरकार हिंदूविरोधी आहे, आम्ही त्याचा निषेध करतो, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

मुंबईत समुद्र आणि नदीकिनारी छटपूजा करण्यास बंदी; महापालिकेने जारी केली नियमावली

छटपूजा साजरी करण्यासाठी भाजप आग्रही; मुंबईत शिवसेना-भाजपचा ‘सामना’ रंगणार

(Aslam Shaikh slams BJP leaders for politicize Chhat puja issue)

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.