Assembly Election 2023 Exit Poll Result : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल सर्वात आधी tv9 वर पाहण्यासाठी येथे भेट द्या

एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळत आहेत आणि कोणाचे सरकार स्थापन होणार आहे यांचा अंदाज येतो. गुरुवारी 30 नोव्हेबरला सायंकाळी 6 वाजल्यानंतर एक्झिट पोलचे ( Exit Poll ) सर्वेक्षण येण्यास सुरवात होईल.

Assembly Election 2023 Exit Poll Result : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल सर्वात आधी tv9 वर पाहण्यासाठी येथे भेट द्या
Assembly Election 2023 Exit Poll Result
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 5:45 PM

Assembly Election 2023 | 29 नोव्हेंबर 2023 : देशात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. मात्र, उद्या गुरुवारी 30 नोव्हेबरला सायंकाळी 6 वाजल्यानंतर एक्झिट पोल ( Exit Poll ) सर्वेक्षण येण्यास सुरवात होईल. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे गुरुवारी येणाऱ्या एक्झिट पोलच्या सर्वेक्षणाकडे लक्ष लागले आहे.

एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळत आहेत आणि कोणाचे सरकार स्थापन होणार आहे यांचा अंदाज येतो. यावेळी छत्तीसगडमध्ये चुरशीची स्पर्धा होणार असल्याचे बोलले जात आहे. तर, तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पुन्हा सत्तेत विराजमान होणार का? याची उत्सुकता आहे .

मध्यप्रदेशमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेसचे कमलनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, भाजपने कॉंग्रेसचे काही आमदर फोडले आणि सत्ता स्थापन केली. शिवराज सिंह चौहान भाजपचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे येथे कमलनाथ विरुद्ध शिवराज सिंह चौहान असा सामना आहे.

हे सुद्धा वाचा

राजस्थानमध्येही कॉंग्रसचे अशोक गेलहोत आणि भाजपच्या वसुंधरा राजे अशी थेट लढत आहे. तर छत्तीसगड विधानसभेत मुख्यमंत्री भूपेश बघेल पुन्हा सत्ता टिकवणार का हा प्रश्न आहे. मिझोरममध्येही मुख्यमंत्री झोरमथांगा यांना भाजपचे आव्हान आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एक्झिट पोल जाहीर करण्यास बंदी घातली आहे. तेलंगणामधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एक्झिट पोल सर्वेक्षण येण्यास सुरवात होईल.

या एक्झिट पोलचे सर्वेक्षण TV9 मराठीवर पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्या

TV9 मराठी यूट्यूब Live TV : https://www.youtube.com/watch?v=04y0H01GTg0

TV9 मराठी Official Live TV : https://www.tv9marathi.com/live-tv

TV9 मराठी Vidhansabha Election live Coverage : https://www.tv9marathi.com/elections

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.