एक्झिट पोल अंदाज 2023 LIVE : पाचपैकी फक्त ‘या’ एका राज्यात भाजपची सत्ता, एक्झिट पोलमध्ये काँग्रेस बाहुबली

| Updated on: Dec 01, 2023 | 12:04 PM

Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, Telangana, Mizoram exit Poll Results 2023 : तेलंगणा विधानसभेसाठी सायंकाळी पाच वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर गुरुवारी 30 नोव्हेबरला सायंकाळी 6 वाजल्यानंतर एक्झिट पोलचे सर्वेक्षण हाती येण्यास सुरूवात झाली असून भाजपला मोठा धक्का बसला असून काँग्रेसने मुसंडी मारली आहे.

एक्झिट पोल अंदाज 2023 LIVE : पाचपैकी फक्त 'या' एका राज्यात भाजपची सत्ता, एक्झिट पोलमध्ये काँग्रेस बाहुबली

मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. तेलंगणा विधानसभेसाठी सायंकाळी पाच वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर गुरुवारी 30 नोव्हेबरला सायंकाळी 6 वाजल्यानंतर एक्झिट पोलचे सर्वेक्षण हाती येण्यास सुरवात झाली. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Nov 2023 06:39 PM (IST)

    पाचपैकी फक्त ‘या’ एका राज्यात भाजपची सत्ता, एक्झिट पोलमध्ये काँग्रेस बाहुबली

    पाच राज्यांचा पोल पाहिला तर एक्झिट पोलनुसार काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आणली आहे. तर भाजपला फक्त राजस्थानमध्ये सत्ता दाखवत आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे सत्तेत असलेला पक्ष परत एकदा आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी ठरलेला आहे.

  • 30 Nov 2023 06:19 PM (IST)

    Chhattisgarh Election Exit Poll Result : छत्तीसगडमध्ये भाजपला सत्ता नाहीच, काँग्रेसची सत्ता कायम

    छत्तीसगडमध्ये भाजप 30-35, काँग्रेस 40-45 आणि इतर 0-3 असा अंदाज पॉलस्ट्रेटने वर्तवला आहे. छत्तीसगडमध्ये भाजप सत्तांतर करण्यात यशस्वी ठरणार नाही. तर काँग्रेस परत एकदा आपली सत्ता आणण्यात यशस्वी ठरलं आहे.

  • 30 Nov 2023 06:14 PM (IST)

    Rajasthan Election Exit Poll Result : राजस्थानमध्ये काँग्रेसला झटका, पुन्हा होणार सत्तांतर

    राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसला 90-100, भाजप 100-110 आणि इतर 5-10 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

  • 30 Nov 2023 06:12 PM (IST)

    MP Election Exit Poll Result : मध्य प्रदेशमध्ये येणार काँग्रेस सरकार

    सगळे एक्झिट पोल मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार येणार असल्याचं दाखवत आहेत. भाजपला मध्य प्रदेशमध्येही मोठा झटका बसणार आहे.

  • 30 Nov 2023 06:06 PM (IST)

    Telangana Election Exit Poll Result : तेलंगणामध्ये भाजप बॅकफूटवर

    तेलंगणामध्ये एक्झिट पोलनुसार काँग्रेस 49-59, बीआरएस 48-58, भाजप 5-10 आणि इतर 0-6 असा अंदाज वर्तवला आहे.

  • 30 Nov 2023 06:02 PM (IST)

    Telangana Election Exit Poll Result : तेलंगणामध्ये काँग्रेस आणि बीआरएसमध्ये काट्याची टक्कर

    तेलंगणामध्ये काँग्रेस आणि बीआरएसमध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचं दिसत आहे. तेलंगणामध्ये भाजप तिसऱ्या क्रमांकावर असण्याचा एक्झिट पोल आहे.

  • 30 Nov 2023 05:58 PM (IST)

    5 State Exit Poll Result : टीव्ही-९ पोलस्टार्टच्या पोलनुसार 5 राज्यांमध्ये भाजपला झटका

    टीव्ही-९ पोलस्टार्टच्या पोलनुसार 5 राज्यांमध्ये भाजपला झटका बसला आहे. पाच राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे.

  • 30 Nov 2023 05:55 PM (IST)

    MP Election Exit Poll Result : मध्य प्रदेशचा एक्झिट पोल

    काँग्रेसला 111- 121, भाजप 106- 116 आणि इतर 0-6 असा अंदाज एक्झिट पोलनुसार सांगण्यात आला आहे.

  • 30 Nov 2023 05:51 PM (IST)

    Chhattisgarh Election Exit Poll Result : इंडिया टीव्हीच्या सर्वनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता

    इंडिया टीव्हीच्या सर्वनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा अंदाज आहे. भाजपला फक्त 30 ते 40 जागा तर काँग्रेसला 46 ते 56 जागा मिळण्याचा अंदाज

  • 30 Nov 2023 05:48 PM (IST)

    Chhattisgarh Election Exit Poll Result : छत्तीसगडमध्ये भाजपची घरवापसी कठीण

    पोलस्टार्टच्या पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपची घरवापसी कठीण वाटत आहे. भाजप 30 ते 35 तर काँग्रेस 40-45 जागा मिळण्याची शक्यता आहे.

  • 30 Nov 2023 05:45 PM (IST)

    MP Election Exit Poll Result : रिपब्लिकच्या सर्वेनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार जाणार

    रिपब्लिकच्या सर्वेनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार जाणार करणार आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपला 118 ते 130 जागा मिळणार आहेत.

  • 30 Nov 2023 05:39 PM (IST)

    Rajasthan Election Exit Poll Result : राजस्थानमध्ये सत्तांतर

    राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. भाजप राजस्थानमध्ये सत्तेत येणार असल्याचं दिसत आहे.

Published On - Nov 30,2023 5:36 PM

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.