AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेआधीच महाविकास आघाडीत बिघाडी?, काँग्रेसचा थेट ठाकरे गटाच्या जागांवर दावा; वादाची ठिणगी पडणार

काही मतदारसंघ हे ठाकरे गटाच्या वाट्याला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही महाविकासआघाडीमध्ये जागावाटपाची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभेआधीच महाविकास आघाडीत बिघाडी?, काँग्रेसचा थेट ठाकरे गटाच्या जागांवर दावा; वादाची ठिणगी पडणार
| Updated on: Aug 01, 2024 | 12:58 PM
Share

Congress Assembly Election 2024 : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. भाजप, मनसेपाठोपाठ आता काँग्रेस पक्षाकडूनही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता काँग्रेसने महाविकासआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या काही जागांवर दावा केला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. सध्या काँग्रेसकडून मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. मुंबई काँग्रेसकडून मुंबईतील सर्वच 36 मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्व निरीक्षक या मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. हे निरीक्षक संपूर्ण मतदारसंघ फिरुन कोणत्या पक्षाचं स्थान बळकट आहे, कोणत्या उमेदवाराला पसंती आहे याचा आढावा घेणार आहेत. हा आढावा घेतल्यानंतर त्याचा संपूर्ण अहवाल तयार केला जाईल. यानंतर तो वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे.

काँग्रेसकडून 15 विधानसभा मतदारसंघावर दावा

तर दुसरीकडे काँग्रेसकडून मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 15 विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल, धारावी, भायखळा, वडाळा, अणुशक्ती नगर, चांदिवली या काही मतदारसघांवर काँग्रेस दावा करणार असल्याचे बोललं जात आहे. यातील काही मतदारसंघ हे ठाकरे गटाच्या वाट्याला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही महाविकासआघाडीमध्ये जागावाटपाची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंतिम जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी समिती स्थापन

दरम्यान महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी वाटघाटी करुन अंतिम जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने समितीची स्थापन केली आहे. यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सात तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे तीन असे एकूण दहा सदस्य आहेत.

काँग्रेसने जागा वाटपासाठीच्या वाटाघाटीसाठी नेमलेल्या समितीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री आरिफ नसीम खान, माजी मंत्री सतेज पाटील यांचा समावेश आहे. तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीमधून मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री असलम शेख यांचा समावेश आहे.

Follow Us
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय