विश्वादर्शक ठरावानंतर आता विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस

नाना पटोले विरुद्ध किसन कथोरेमध्ये लढत यांच्या ही लढत होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार (Assembly speaker election)  आहे.

विश्वादर्शक ठरावानंतर आता विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस
Maharashtra Vidhansabha
Follow us
| Updated on: Dec 01, 2019 | 10:16 AM

मुंबई : गेल्या महिन्याभरातील नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात अखेर महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली (Assembly speaker election)  आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत (Assembly speaker election)  पास  झाले. या विश्वासदर्शक ठरावावेळी महाविकासआघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत पडली. त्यामुळे महाविकासआघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर भाजपने सभागृहातून सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शून्य मते (Assembly speaker election)  पडली.

दरम्यान विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आज (1 डिसेंबर) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला महाविकासआघाडीला सामोरे जावं लागणार आहे. नाना पटोले विरुद्ध किसन कथोरेमध्ये लढत यांच्या ही लढत होणार आहे. महाविकासआघाडीकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नाना पटोले तर भाजपकडून किशन कथोरे विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. आज (1 डिसेंबर) सकाळी 11 वाजता ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार (Assembly speaker election)  आहे.

मंत्रिमंडळ विस्तार आणि उपमुख्यमंत्रिपद

विधानसभा अध्यक्षानंतर आता अनेकांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्तार आणि उपमुख्यमंत्रिपदाकडे लागले आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये रस्सीखेच सुरु आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाची माळ कोणच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या पक्षाकडे किती खाती जाणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले आहे. महाविकासआघाडीच्या बाजून 169 सदस्यांची मतं पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. यादरम्यान 4 सदस्य तटस्थ राहिले.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी अनुमोदन केले.

  • विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने – 169
  • विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात – शून्य
  • तटस्थ – 4
  • विश्वासदर्शक ठराव संमत

दरम्यान विश्वादर्शक ठरावावेळी 4 सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. यात मनसे 1, माकप 1, तर एमआयएमच्या दोन आमदारांचा समावेश आहे. कल्याण ग्रामीणमधून निवडून आलेले मनसे आमदार प्रमोद पाटील, डहाणूमधून निवडून आलेले माकपचे विनोद निकोले हे दोन सदस्य तटस्थ राहिले. तसेच एमआयएमचे धुळे शहर मतदारसंघातून फारूक शाह तर मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मात्र त्यानंतर त्यांनी पाठिंबा दर्शवला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.