गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी झाडे तोडण्यास औरंगाबाद महापालिकेचा नकार

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी दूध डेअरी परिसरातील तब्बल 110 झाडे तोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव महापालिकेने नाकारला आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी झाडे तोडण्यास औरंगाबाद महापालिकेचा नकार
Follow us
| Updated on: Jan 15, 2020 | 9:54 PM

औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबाद शहरातील स्मारकाच्या मुद्याला आता नवीन वळण मिळालं आहे (Gopinath Munde Memorial). गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी दूध डेअरी परिसरातील तब्बल 110 झाडे तोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव महापालिकेने नाकारला आहे. एकही झाड न तोडता स्मारक कसं उभारता येईल, याचा नकाशा महापालिकेला देण्याच्या सूचना सिडको विभागाला देण्यात आल्या आहेत (Gopinath Munde Memorial). त्यामुळे आता गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक झाडे न तोडता पूर्ण होईल का, असा सवाल उपस्थित होत आहे ().

औरंगाबाद शहरातील प्रशस्त आशा दूध डेअरीच्या परिसरात गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक साकारलं जात आहे. या स्मारकासाठी दूध डेअरी परिसरातील दुर्मिळ आणि अत्यंत मोठी अशी 110 वृक्ष तोडली जाणार होती. ही झाडे तोडण्याचा प्रस्ताव सिडको विभागाने महापालिकेला पाठवला होता. महापालिकेने नियमानुसार ही झाडे तोडण्यासाठी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिध्द करून सूचना आणि हरकती मागवल्या. पण, सूचना, हरकतीनुसार एकही झाड न तोडण्याच्या अनेक सूचना पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या. या सूचनांना नजरेसमोर ठेऊन पालिकेने उद्यान विभागाला झाडे तोडण्याची परवानगी नाकारली. मात्र, एकही झाड न तोडता स्मारक कसं बनवता येईल याचा नकाशा देण्याची सूचना केली आहे.

औरंगाबाद शहरात अलिकडल्या काळात दोन महत्वाची समरके होऊ घातली आहेत. त्यात गोपीनाथ मुंडे आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांचा समावेश आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडे तोडली जाण्याची शक्यता गृहीत धरून अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली होती. मात्र, त्या टीकेची फारशी दखल घेतली नसल्याचं दाखवत शिवसेनेने बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडणार नसल्याचा खुलासा केला. पण, तत्पूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी झाडे तोडण्याच्या दिलेल्या प्रस्तावावरून भाजपला आता माघार घ्यावी लागली आहे. भाजपने सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नये अशी भूमिका घेतली आहे.

Cutting tree for Gopinath Munde Memorial

VIDEO :

Non Stop LIVE Update
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.