ठाकरे सरकारचा आणखी एक दणका, अ‍ॅक्सिस बँकेतील ‘ती’ खाती वळवणार?

महाविकास आघाडी सरकारकडून अ‍ॅक्सिस बँकेतील वेतन खाती पुन्हा स्टेट बँकेसारख्या एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्याच्या हालचालींना जोर आला आहे.

ठाकरे सरकारचा आणखी एक दणका, अ‍ॅक्सिस बँकेतील 'ती' खाती वळवणार?
Follow us
| Updated on: Dec 25, 2019 | 1:46 PM

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तापालटाचा फटका ‘अ‍ॅक्सिस बँके’सारख्या खाजगी क्षेत्रातील देशात ‘टॉप 5’मध्ये असलेल्या बँकेलाही बसण्याची शक्यता आहे. पोलिस विभागाची वेतन खाती (सॅलरी अकाऊण्ट्स) अ‍ॅक्सिस बँकेतून हलवण्याच्या हालचाली (Axis Bank Salary Accounts) ठाकरे सरकारने सुरु केल्या आहेत. जवळपास दोन लाख पोलिसांची अकरा हजार कोटी रुपयांची खाती पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवली जाण्याची चिन्हं आहेत. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य पोलिस विभागात दोन लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे वार्षिक पगार 11 हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून अ‍ॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती. माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ‘अ‍ॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे याचा संबंध जोडला जात होता.

सत्तापालटानंतर महाविकास आघाडी सरकारकडून ही खाती पुन्हा स्टेट बँकेसारख्या एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्याच्या हालचालींना जोर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारसारखा मोठा ग्राहक ‘अ‍ॅक्सिस’च्या अ‍ॅक्सिसबाहेर जाणार आहे. महिनाअखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रत्येक खात्याला मंत्री मिळाल्यानंतर हा बदल करण्याचा ठाकरे सरकारचा मानस आहे.

केवळ राष्ट्रीयकृत बँकांद्वारे वेतन आणि अनुदान वितरणाच्या प्रस्तावावर सरकार विचार करत असल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ‘मुंबई मिरर’शी बोलताना पुष्टी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार ही खाती वर्ग करण्यात आल्याचा दावा करत नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी ऑगस्टमध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) याचिका दाखल केली होती. अमृता फडणवीस अ‍ॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष आणि पश्चिम भारताच्या कॉर्पोरेट प्रमुख आहेत.

या हस्तांतरणाचा फायदा ‘अ‍ॅक्सिस बँके’ला झाला, मात्र स्टेट बँकेला मोठा तोटा सहन करावा लागला, असा दावा जबलपुरे यांनी केला. मार्च 2005 मध्ये म्हणजेच अमृता यांच्याशी लग्न होण्याच्या आठ महिने आधीच ही खाती अ‍ॅक्सिस बँकेत उघडली गेल्याचा दावा, देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर, फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने त्यावेळी केली होती.

‘अ‍ॅक्सिस बँक किंवा सरकारी खात्यांशी संबंधित कोणत्याही बँकांची निवड मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली होती. जर सरकारमधील एखाद्याला असं वाटतं, की माझी पत्नी त्या बँकेत काम करते, म्हणून ते माझ्या सरकारची बदनामी करु शकतात, तर तसं होणार नाही. माझी पत्नी कधीच सरकारी कार्यालयात आली नाही किंवा पाच वर्षांत एखाद्या सरकारी अधिकाऱ्याशी तिने भेट घेतलेली नाही, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं होतं.

‘अ‍ॅक्सिस बँक ही देशातील एक जबाबदार बँकिंग आणि वित्तीय संस्था आहे. सैन्य आणि पोलिस या दोन्ही गणवेशधारक दलांची सेवा करणे हे अ‍ॅक्सिस बँकेचं लक्ष्य तर आहेच, पण अभिमानास्पद बाबही आहे. आम्ही देश आणि राज्यांमध्ये गुंतवणूक करत राहू’ असं अ‍ॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दहिया यांनी पत्रक काढून (Axis Bank Salary Accounts) म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा हल्ला

‘नशीब, मुख्यमंत्री स्वतःचं गुणगान ‘गात’ नाहीत’, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं उत्तर

अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून कोण उत्तर देणार? संजय राऊत म्हणतात…

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.