AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून कोण उत्तर देणार? संजय राऊत म्हणतात…

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या उत्तर देतील, असं खासदार संजय राऊत म्हणाले

अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून कोण उत्तर देणार? संजय राऊत म्हणतात...
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 23, 2019 | 1:28 PM
Share

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या उत्तर देतील, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Amruta Fadnavis) म्हणाले. संजय राऊत यांचा अंगुलीर्निदेश शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडे दिसतो. ‘फक्त ठाकरे आडनाव लावून चालत नाही’ अशा शब्दात मिसेस फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला होता.

महाराष्ट्रानंतर आता झारखंडही भाजपच्या हातातून निसटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी झारखंडमध्ये मोठी ताकद लावली होती. मोदींच्या नावे मतं मागितली गेली. नवीन नागरिकत्व कायदा आल्यानंतर त्याचा फायदा होईल, अशी भाषणं झाली. मात्र झारखंडच्या गरीब आणि आदिवासी जनतेने भाजपला नाकारलं. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार झारखंडमध्ये येताना दिसत आहे. महाराष्ट्रानंतर भाजप हातून का गेलं, यासाठी भाजपला आत्मचिंतनाची गरज आहे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

‘मी अमृता फडणवीस यांचं ट्वीट वाचलेलं नाही, मला माहिती नाही. मात्र अमृता फडणवीस यांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्याच उत्तर देतील’ असं राऊत म्हणाले. शिवसेना भवनात झालेल्या बैठकीनंतर राऊत बोलत होते.

सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादांची बुद्धी भ्रष्ट केली, शिवसेना नगरसेवकाचा अमृता फडणवीसांवर पलटवार

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावरुन ट्विटरवर टीका केली होती. ‘राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय आहे! वीर सावरकर आणि त्यांची महानता किंवा सत्कार्यांच्या जवळपासही राहुल गांधी पोहचत नाहीत. इतकंच नव्हे, तर त्यांनी स्वत:ला ‘गांधी’ समजण्याची चूकही करु नये! कोणीही गांधी आडनाव लावून ‘गांधी’होऊ शकत नाही!’ असं ट्वीट फडणवीसांनी केलं होतं.

देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट कोट करुन अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी. त्याचप्रमाणे ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्वीट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टॅगही केलं होतं.

याआधीही अमृता फडणवीस यांनी आरे कारशेडसाठी वृक्षतोडीला दिलेल्या स्थगितीवरुन शिवसेनेला टोला लगावला होता. औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडं कापण्यात येणार आहेत, अशा आशयाची बातमी एका वृत्तपत्रात छापून आली होती. या बातमीचा फोटो अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. “शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीला विरोध करतात. तसेच शिवसेना कमिशनखोर आहे. त्यांचा ढोंगीपणाचा आजार लवकर बरा होवो,” असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर प्रियांका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस यांच्यात ट्विटरवॉर रंगला होता. आताही सेनेकडून चतुर्वेदी काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागलं आहे.

Sanjay Raut on Amruta Fadnavis

Follow Us
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा