AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर बाबा सिद्दीकी ‘या’ पक्षात प्रवेश करणार; सुत्रांची माहिती

Baba Siddique Resignation To Congress may Be inter in other Party : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्याय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर सिद्दीका 'या' पक्षात प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर बाबा सिद्दीकी 'या' पक्षात प्रवेश करणार; सुत्रांची माहिती
| Updated on: Feb 08, 2024 | 11:38 AM
Share

मुंबई | 08 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एका मागोमाग एक धक्का बसत आहे. मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ वरिष्ठ नेते बाबा सिद्दकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. 48 वर्षांपासून बाबा सिद्दीकी काँग्रेस पक्षात काम करत होते. मागच्या काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी पक्षात नाराज असल्याची चर्चा होती.आज अखेर सिद्दीकी यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेस सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसला राजीनामा दिल्यानंतर बाबा सिद्दीकी महायुतीत सामील होणार असल्याची माहिती आहे. ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

बाबा सिद्दीकी यांचं ट्विट

बाबा सिद्दीकी यांनी एक ट्विट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. मी माझ्या तरुणपणात काँग्रेस पक्षात सामील झालो. मागच्या 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तातडीने राजीनामा देत आहे. मी काँग्रेस का सोडत आहे, याबाबत माझं मत मला व्यक्त करायला खूप आवडलं असतं. पण ते म्हणतात ना की काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात. तसंच आहे, या राजीनाम्याबाबत मी फारसं काही बोलणार नाही. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असं बाबा सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एका महिन्यात काँग्रेसला दोन धक्के

14 जानेवारी या दिवशी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला राम राम केला. ट्विट करत मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्याचदिवशी दुपारी देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या नाराजीची सर्वत्र चर्चा झाली. आज बाबा सिद्दीकी यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे मागच्या महिनाभरात महाराष्ट्र काँग्रेसला दोन मोठे धक्के बसले आहेत.

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. काहीच दिवसात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात मुंबईतील दोन बड्या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम येत्या काळातील निवडणुकांमध्ये काँग्रेसवर होणार का? तसंच महायुतीला याचा फायदा होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.