शरद पवार यांना भेटताच बच्चू कडू यांचं मोठं सूचक विधान; राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार?

"शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग ज्यांनी आमच्यावर अफाट प्रेम केलं, त्यांच्या नाराजीचा सूर आम्ही सरकारसमोर ठेवत असतो. तोच आमचा विषय आहे", असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांना भेटताच बच्चू कडू यांचं मोठं सूचक विधान; राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार?
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 11:00 AM

Bacchu Kadu Meet Sharad Pawar :  गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आज सकाळी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. शनिवारी (१० ऑगस्ट) सकाळी ८ च्या दरम्यान मोदीबागेत शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट झाली. या भेटीत बच्चू कडू यांनी महाविकासआघाडीमध्ये सहभागी होण्याबद्दल मोठे वक्तव्य केले. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

आम्ही सरकारला 1 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला

“बच्चू कडू शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू आणि महायुती यांच्यात धुसफूस चालू आहे. त्यातच आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्ही सरकारला 1 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ”, असे वक्तव्य केले.

शरद पवारांशी ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

माझी आणि शरद पवारांची भेट आधीच ठरली होती. मी काल ज्या मुद्द्यांवर आंदोलन केलं, त्याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली. ज्याप्रमाणे जाती, धर्मांवर राजकारण होतं, त्याच प्रमाणे शेतकरी, शेतमजूर दिव्यांग आणि जे कोणी अडचणीत असणारी लोकं आहेत, त्यांच्यावर राजकारण व्हायला पाहिजे. ते मुद्दे चर्चेत यायला हवेत. यावरच शरद पवारांशी चर्चा झाली, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

मी महायुतीतील कोणत्याही नेत्यावर आरोप केलेला नाही. येत्या १ सप्टेंबरपर्यंत आम्ही महायुती सरकारला वेळ दिला आहे. तोपर्यंत मी सर्वच पक्षांचे या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करत आहे. अजून तरी शरद पवारांसोबत जाण्याचा कोणताही विचार केलेला नाही. आम्ही सरकारला १ सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ, असे बच्चू कडू म्हणाले.

“माझ्या नाराजीवर काहीही अवलंबून नाही”

यापुढे बच्चू कडू यांनी महायुतीतील नाराजीबद्दलही वक्तव्य केले. “माझ्या नाराजीवर काहीही अवलंबून नाही. माझ्यासाठी शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. बच्चू कडू स्वत:साठी कधीही नाराज होत नाही. ते कधीही नाराज असणार नाहीत. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग ज्यांनी आमच्यावर अफाट प्रेम केलं, त्यांच्या नाराजीचा सूर आम्ही सरकारसमोर ठेवत असतो. तोच आमचा विषय आहे. आम्ही त्यांना बैठक, चर्चा हे करण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. या बैठकीदरम्यान सरकार काय निर्णय घेतं, कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतं, यासाठी सरकारला हा वेळ दिला आहे.

शेतकरी, कर्जमाफी, शेतमजूरांचे काही प्रश्न आहेत, याबद्दल शरद पवारांशी चर्चा केली. मी अजून महाविकासआघाडीत जाण्याबद्दल निर्णय घेतलेला नाही. मी १ सप्टेंबरपर्यंत काहीही करणार नाही. सरकारला त्यांच्या वेळ दिलेला आहे. मुद्द्यासाठी काहीही करु. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांसाठी काहीही करु”, असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले. त्यामुळे आता येत्या काळात बच्चू कडू महाविकासाआघाडीत सहभागी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....