AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLA Nitin Deshmukh Missing | बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख मिसिंग!, पत्नीची अकोला शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

नितीन देशमुख यांचा मुक्काम एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये होता. मात्र, आज सकाळी छातीमध्ये दुखू लागल्यामुळे देशमुख यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नितीन देशमुख यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याची माहिती आहे.

MLA Nitin Deshmukh Missing | बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख मिसिंग!, पत्नीची अकोला शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
शिवसेना आमदार नितीन देशमुख
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jun 21, 2022 | 5:57 PM
Share

अकोला : महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघातील आमदार आहे. देशमुख हे काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये गेलेले बाळापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने अकोला शहर (City Police) पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. कालपासून माझे पती बेपत्ता आहेत. त्यांना लवकर शोधावे, असे प्रांजल देशमुख (Pranjal Deshmukh) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आज पहाटेच्या सुमारास नितीन देशमुख यांना सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.

छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

नितीन देशमुख यांचा मुक्काम एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये होता. मात्र, आज सकाळी छातीमध्ये दुखू लागल्यामुळे देशमुख यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नितीन देशमुख यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याची माहिती आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता नितीन देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजल देशमुख यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

काल संध्याकाळी सात वाजल्यापासून फोन बंद

काल संध्याकाळी सहा वाजता माझे त्यांच्याशी शेवटचे बोलणे झाले. मी थोड्याच वेळात मुंबईहून अकोल्याला येण्यासाठी निघेन, असे त्यांनी मला फोनवर सांगितले. मात्र, सात वाजल्यापासून त्यांचा फोन बंद आहे. त्यांचा पीए आणि सहकारी स्टेशनवर त्यांची वाट बघत होते. मात्र, ते विधानभवनातून परत आलेच नाहीत. कालपासून माझा त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे मी अकोला शहर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. आता पोलिसांनी त्यांना तातडीने शोधावे, असे प्रांजल देशमुख यांनी सांगितले.

आमदार नितीन देशमुखांना शिवसैनिक धडा शिकविणार

अकोला : महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे नितीन देशमुख देशमुख हे काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. हे बाळापूर मतदारसंघातील आमदार असून ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांकडे माझे पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. अकोल्यात शिवसेना संपवण्यासाठी देशमुख हे भाजपची नेहमीचं करतात. याबाबत अनेक तक्रारी पक्ष प्रमुखांकडे केल्या. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. आज हे सर्व समोर आलं. पक्ष प्रमुख आदेश देणार, तो देणार. मात्र तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. याअगोदर स्थानिक शिवसैनिक देशमुख यांना सोडणार नाही. धडा शिकवणारचं, असा इशारा पिंजरकर यांनी दिला आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?