AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांनी भर सभेत शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि नंतर माघारीही घेतला होता, वाचा खास किस्सा…

शिवाजी पार्कवरील झालेल्या सभेत मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं ते म्हणाले. एकंदरित विधानसभा निवडणुकीतलं आलेलं अपयश आणि मुंबई महापालिकेचा तो पराभव बाळासाहेबांच्या सर्वार्थाने जिव्हारी लागला होता...!

बाळासाहेबांनी भर सभेत शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि नंतर माघारीही घेतला होता, वाचा खास किस्सा...
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Aug 15, 2021 | 6:40 AM
Share

मुंबई :  बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वडील संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे बिनीचे शिलेदार प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं 20 नोव्हेंबर 1973 रोजी निधन झालं… आईनंतर दुसरं सत्र बाळासाहेबांच्या डोक्यावरुन हरपलं… शिवसेना उभी करण्यात प्रबोधनकारांचा मोलाचा वाटा होता… बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे संबंध अगदी मित्रत्वाचे होते. अनेक गोष्टी ते एकमेकांशी शेअर करायचे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जाण्याने बाळासाहेबांच्या आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु बाळासाहेब यांच्या पत्नी मीनाताईंच्या सामर्थ्यानं आणि शिवसैनिकांच्या बळावर बाळासाहेब पुन्हा उभा राहिले…!

1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीला बाळासाहेबांनी शिवसेनेच्या वतीने पाठिंबा दिला… खरंतर त्या काळात बाळासाहेबांचा हा निर्णय अनेक सेना नेत्यांना रुचला नव्हता, पचलाही नव्हता… बाळासाहेबांनी असा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न अनेक शिवसैनिकांना पडला होता…. पण बाळासाहेबांचा आदेश तो आदेश असतो… बाळासाहेबांपुढे कोण काय बोलणार…? बाळासाहेबांनी मार्मिकच्या अनेक अंकातून मराठी माणसांवरील अन्यायाला तत्कालीन काँग्रेस राजवटीला जबाबदार धरले होते… मग अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांना पाठिंबा का? असा प्रश्न अनेक दिग्गजांना पडला…

पण बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना नव्हे तर इंदिरा गांधींच्या योग्य वेळी आणीबाणीचा जाहीर केलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला होता… मतभेद असावेत पण मनभेद नसावेत असं म्हटलं जातं… बाळासाहेबांचा विरोध आयुष्यभर सर्वांशी मतभेदाच्या स्वरुपात झाला आणि मनभेद होण्यापूर्वीच बाळासाहेब ते नातं सावरत असत… अनेकांना बाळासाहेब शेवटपर्यंत समजले नाहीत…

बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा

1978 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना करिष्मा दाखवू शकली नाही… मुंबई महापालिका निवडणुकीत देखील शिवसेना नेते-उमेदवारांचा दारुण पराभव झाला… त्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली… शिवाजी पार्कवरील झालेल्या सभेत मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं ते म्हणाले. एकंदरित विधानसभा निवडणुकीतलं आलेलं अपयश आणि मुंबई महापालिकेचा तो पराभव बाळासाहेबांच्या सर्वार्थाने जिव्हारी लागला होता…!

शिवसैनिकांच्या आग्रहास्तव बाळासाहेबांनी आपला निर्णय मागे घेतला!

त्यावेळी शिवाजी पार्कवर एकच हल्लकल्लोळ माजला… उपस्थित शिवसैनिकांनी ‘नाही नाही…’ असा आवाज केला… त्यावेळेस जरी काही गोष्टींना आधारुन बाळासाहेबांचे विचार शिवसैनिकांना समजले नव्हते, पटले नव्हते, परंतु बाळासाहेबांवर त्यांची प्रचंड निष्ठा होती… त्यामुळे तिथं एकच गदारोळ झाला आणि शिवसैनिकांच्या आग्रहास्तव बाळासाहेबांनी राजीनामा मागे घेतला….!

(Balasaheb Thackeray had resigned from the post of Shiv Sena chief and had also withdrawn)

(यशराज पारखी लिखित बाळासाहेब ठाकरे यशोगाथा या पुस्तकातून सदरचा प्रसंग लिहिला आहे…)

हे ही वाचा :

शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी सभागृहात पेट्रोल अंगावर ओतून घेतलं, हर्षवर्धन पाटलांनी विधिमंडळ जळण्यापासून वाचवलं!

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल