Maratha Reservation | मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण न करता साथ दिली पाहिजे : बाळासाहेब थोरात

कांद्याची निर्यातबंदी, मराठा आरक्षण, मंदिर उघडण्यासंदर्भात बाळासाहेब थोरातांनी भाजपवर टीका केली आहे. (Balasaheb Thorat on Maratha Reservation Issue)

Maratha Reservation | मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण न करता साथ दिली पाहिजे : बाळासाहेब थोरात

अहमदनगर : कोरोना संकटात शेतकरी भरडला गेला आहे. तर शेतीमालाला देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी हे शेतकऱ्याच्या दुःखावर डागण्यात आलं आहे, अशी टीकाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तसेच मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण करु नये, तर त्यांनी साथ दिली पाहिजे असेही थोरात म्हणाले. कांद्याची निर्यातबंदी, मराठा आरक्षण, मंदिर उघडण्यासंदर्भात बाळासाहेब थोरातांनी भाजपवर टीका केली आहे. (Balasaheb Thorat on Maratha Reservation Issue)

“मराठा आरक्षणासंदर्भात पूर्णपणे काँग्रेस किंवा आघाडी सरकार योग्य ती काळजी घेत आहे. त्यामुळे यावर राजकारण करण्याऐवजी सगळ्यांनी मदत करणं गरजेचे आहे. ज्यावेळेला त्यांचे सरकार होते, त्यावेळेस आम्ही कोणतेही राजकारण केलं नाही. प्रत्येक गोष्टीत आमची साथ होती. आता त्यांनी देखील साथ दिली पाहिजे,” असं इच्छा थोरातांनी व्यक्त केली आहे.

“शेतकऱ्याच्या वेळेसच निर्णय चुकीचा घेतला हे निषेधार्ह आहे. हा सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात आहे,” असे थोरात म्हणाले.

त्याचबरोबर मंदिर उघडण्यावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप थोरातांनी केला आहे. “कोरोनाचे संकट आहे. हे संपल पाहिजे. त्यामुळे इथे राजकारण करण्याची जागा नाही. जिथे लोक एकत्र येतात तिथे संसर्ग वाढतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील,” अस मत त्यांनी व्यक्त केलं आहे. (Balasaheb Thorat on Maratha Reservation Issue)

संबंधित बातम्या : 

लोकल सेवा सुरु करण्यावरुन मनसे-शिवसेना आमने-सामने, प्रवाशांच्या सुरक्षेवरुन खडाजंगी

मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड

Published On - 8:22 am, Sun, 20 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI