बाळासाहेब थोरातांची 2 महिन्यापूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली!

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat's prophecy about Devendra Fadnavis ) यांनी दोन महिन्यापूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.

बाळासाहेब थोरातांची 2 महिन्यापूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली!


 कोल्हापूर : राजकारणात कधी कुणाचे अच्छे दिन येतील आणि कधी कुणाची सत्ता जाईल हे सांगता येत नाही. याचाच अनुभव आता महाराष्ट्र घेतोय. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत आली असली तरी दोन महिन्यांपूर्वी अशा आघाडीची कुणी कल्पनांही केली नसेल. त्यामुळंच निवडणुकीच्या आधी नेत्यांनी केलेली विधान आता चांगलीच चर्चेत येत आहेत. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat’s prophecy about Devendra Fadnavis ) यांनी दोन महिन्यापूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.

निवडणुकीपूर्वी राज्यात विरोधकच शिल्लक नाहीत असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत होते. शिवाय आता राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचा नव्हे तर वंचित बहुजन आघाडीचा विरोधीपक्ष नेता असेल, असंही ते म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापुरात मार्मिक प्रत्युत्तर दिलं होतं.

फडणवीस यांनी आरशासमोर उभं राहावं त्यांना पुढचा विरोधीपक्ष नेता दिसेल असं त्यांनी म्हटलं होतं. दोन महिन्यापूर्वी थोरातांनी केलेली भविष्यवाणी आता खरी ठरली आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्षात दिसत आहेत.

गेल्या महिन्याभरात राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष जनतेनं पहिला. सत्तेच्या राजकारणात अनेक ट्विस्ट आल्यानंतर अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत बसली आहे. तर भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं आणि त्यांचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत.

विरोधकच शिल्लक राहणार नाहीत असं म्हणणाऱ्या फडणवीस यांना विरोधीपक्ष नेता झाल्याबदल खासदार संजय राऊत यांनी आज शुभेच्छा दिल्या असल्या, तरी थोरातांनी ही भविष्यावाणी आधीच केली होती. आता दोन महिन्यापूर्वीची ही भविष्यवाणी सोशल मीडियात देखील चर्चेचा विषय बनला आहे.

(Balasaheb Thorat’s prophecy about Devendra Fadnavis)

संबंधित बातम्या  

मुख्यमंत्र्यांनी आरशासमोर उभं रहावं, त्यांना विरोधी पक्षनेता दिसेल : बाळासाहेब थोरात 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI