AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास आनंद होईल; शिंदेगटातील खासदाराने बोलून दाखवली इच्छा

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास आनंद होईल, अशी इच्छा शिंदेगटातील खासदाराने बोलून इच्छा दाखवली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास आनंद होईल; शिंदेगटातील खासदाराने बोलून दाखवली इच्छा
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jan 07, 2023 | 4:17 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Modi Government) विस्तार लवकरच होईल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेगटातील खासदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाल्यास आनंद होईल, अशी प्रतिक्रिया शिंदेगटाचे खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी दिलीय.

मंत्रीमंडळात कुणाला घ्यायचं आहे.मंत्रिपदाचा निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे घेतील. पण मी तीन वेळा आमदार आणि खासदार राहिलो आहे. माझ्या पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने करायला तयार आहे. पक्षाचा नावलौकीक वाढवण्यासाठी प्रयत्न करीन, असं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे.

केंद्रात लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा राजधानी दिल्लीत सुरु आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात बाळासाहेबांची शिवसेना गटाला देखील स्थान दिलं जाणार आहे. यामध्ये शिंदे गटाच्या 13 खासदारांपैकी अनेक खासदारांची नाव चर्चेत आहे. या संदर्भात शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी माध्यमांशी बातचीत करताना पक्षाने जर संधी दिली तर मी आनंदाने स्विकारेल असं जाधव यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी आम्हाला दलाल कचरा म्हटलं. तुम्ही याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर निवडून आला आहात. तुम्हाला जर मत देणारे कचरा असतील तर त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील कोण आहात? संजय राऊत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील घाण आहेत का?, असा सवाल शिंदेगटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची संजय राऊत यांच्यावर टीका केली.

शिंदेगटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना आम्ही जर कचरा असू तर आमची मत घेऊन निवडून आलेले संजय राऊत हे कचऱ्यांच्या ढिगाऱ्यावरील काय आहेत? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच आता राज्यात शिंदेगटाने बंड करत भाजपची साथ दिलीय. त्यामुळे उद्धव ठाकरेंशी फारकत घेत भाजपची साथ देणाऱ्या शिंदेगटाला मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल.

Follow Us
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...