AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मोदींचा दहा लाखांचा सूट ओक्के, राहुल गांधींचा टी शर्ट नॉट ओक्के; काँग्रेसचा भाजपाविरोधात ‘बॅनरवार’

काँग्रेसच्या वतीने कल्याणमध्ये भाजपाच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमधून भाजपाला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

Video : मोदींचा दहा लाखांचा सूट ओक्के, राहुल गांधींचा टी शर्ट नॉट ओक्के; काँग्रेसचा भाजपाविरोधात 'बॅनरवार'
| Updated on: Sep 12, 2022 | 10:21 AM
Share

ठाणे:  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महागड्या ब्रॅन्डचा टी शर्ट घातला. ज्या टी शर्टची किंमत 41 हजार होती असा दावा भाजपाकडून (BJP) करण्यात आला आहे. यावरून भाजपच्या काही नेत्यांनी राहुल गांधी यांना ट्रोल देखील केले. मात्र हाच मुद्दा पकडत आता काँग्रेसकडून (Congress) देखील भाजपावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेसच्या वतीने कल्याणमध्ये भाजपाच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमधून भाजपाला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

बॅनरमध्ये नेमकं काय?

काँग्रेसकडून भाजपाविरोधात कल्याणमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मोदींचा दहा लाखांचा सूट चालतो,  अनुराग ठाकुर यांच्या मुलाचा बरबरीचा टी शर्ट चालतो, मग राहुल गांधींचा टी शर्ट डोळ्यात का खूपतो? असा सवाल भाजपाला करण्यात आला आहे.

पुढे या बॅनरमध्ये म्हटले आहे की, वाढती महागाई, बेरोजगारी, वाढणारे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर, महिलांची असुरक्षिता, शेतकऱ्यांचे प्रश्न,  कोलमडलेली अर्थव्यवस्था असे अनेक मोठे प्रश्न देशासमोर सध्या आहेत.  असे अनेक प्रश्न असताना जनतेची दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकाराचा जाहीर निषेध. आता या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टी शर्टवरून राहुल गांधी ट्रोल

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हजारो रुपये किंमत असलेला टी शर्ट घातल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात आला. या टी शर्टवरून राहुल गांधी यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले. मात्र त्यानंतर आता काँग्रेसने देखील भाजपाच्या नेत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.