वाढदिवस शरद पवार अन् जयंती मुंडेंची, नशीब उजळलं  12 बाळांचं, बीडच्या मामाचा आनंद पाहा…

यानिमित्ताने मला 12 लेकरांचा मामा होता आलं, याचा आनंद मोठा आहे.. असं बीएम प्रतिष्ठानचे बाळासाहेब मस्के यांनी बोलताना म्हणाले..

वाढदिवस शरद पवार अन् जयंती मुंडेंची, नशीब उजळलं  12 बाळांचं, बीडच्या मामाचा आनंद पाहा...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 4:16 PM

बीडः सोमवारी 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा वाढदिवस आणि बीडचे लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची जयंती. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुंडे यांच्याशी संबंधित संघटनांकडून कालचा दिवस जल्लोषात साजरा झाला. पण राज्यात आणखी एक चर्चा रंगलीय ती बीडच्या मामाची. पवारांचा वाढदिवस अन् स्व. मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडच्या (Beed) मामाने चक्क 12 बाळांना सोन्याच्या अंगठ्याच गिफ्ट केल्या.

सोमवारी 12 डिसेंबर रोजी जन्मलेल्या बाळांना बीएम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्याकडून सोन्याची अंगठी आणि मातांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले. गेवराई शासकीय रुग्णालयात जन्म  Praघेतलेल्या बाळांना मस्के यांनी मामाकडून ही छोटीशी भेट असल्याचं सांगत त्यांचं कौतुक केलं. येथील 12 नवजात बालकांचे यावेळी औक्षण करण्यात आले.

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजीचा जन्मदिवस आहे. दोघांनाही देशात महाराष्ट्राचे मोठे नाव केले आहे. म्हणून 12 डिसेंबर रोजी जन्म घेतलेल्या नवजात बालकांचा बीएम प्रतिष्ठानच्या वतीने अनोखा सन्मान करण्यात आला.

Beed गेवराई उपजिल्हा रुग्णालयात 12 डिसेंबर रोजी 12 माता प्रसूत झाल्या होत्या. यात 6 मुले तर 6 मुलींनी जन्म घेतला. याच नवजात बालकांना सोन्याची अंगठी, ड्रेस आणि मातांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्राच्या घरा-घरात पोहोचणारे नेते म्हणून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कार्याचा उजाळा अविरत रहावा यासाठीच हा संकल्प करण्यात आला… मला 12 लेकरांचा मामा होता आले याचा आनंद मोठा आहे असं बीएम प्रतिष्ठानचे बाळासाहेब मस्के यांनी बोलताना म्हणाले..

रुग्णालयातील स्टाफदेखील सोहळ्यात सहभागी…

नवजात बालकांचा सन्मान पाहिल्यांदाच झाला आहे. पहिल्यांदाच मुलींचाही सन्मान होत असल्याने या औक्षण सोहळ्यात रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी देखील नवजात बाळांसह मातांचा सन्मान केला. यावेळी जिल्हा रुग्णालयात मोठा उत्साह दिसून आला.

Non Stop LIVE Update
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.