AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete Funeral: विनायक मेटे यांच्यावर आज अंत्यसंस्कार, लाडक्या नेत्यांला अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

Vinayak Mete: शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव बीडमधील केज तालुक्यातील राजेगाव या त्यांच्या मूळगावी दाखल झालं आहे. दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Vinayak Mete Funeral: विनायक मेटे यांच्यावर आज अंत्यसंस्कार, लाडक्या नेत्यांला अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
| Updated on: Aug 15, 2022 | 9:02 AM
Share

केज, बीड : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालंय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर त्यांच्या त्यांच्या गाडीला अपघात झाला. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल त्यांचं पार्थिव मुंबईतील वडाळ्यातील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी ते बीडच्या दिशेने रवाना झालं. त्यांचं पार्थिव बीडमधील केज तालुक्यातील राजेगाव या त्यांच्या मूळगावी दाखल झालं आहे. गावातील लोक, त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांना अंत्यदर्शन घेता यावं यासाठी त्यांचं पार्थिव शिवसंग्राम भवनात आणि त्यांच्या घरात ठेवण्यात येणार आहे. विनायक मेटेंवर (Vinayak Mete) आज दुपारी तीन वाजता राजेगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अपघाती निधन

विनायक मेटे यांच्या काल पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. विनायक मेटे म्हणजे आंदोलनांचा बुलंद आवाज… सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारत सळो की पळो करून सोडणारे विनायक मेटे… मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरत आंदोलन करणारे विनायक मेटे… मराठा समाजाच्या आंदोलनांचा चेहरा… अश्या या नेत्याच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळलाय…

अंतयात्रा

आज दुपारी तीन वाजता बीड येथील जालना रोडवरील उत्तम नगरातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागील सिध्दीविनायक पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्य यात्रेदरम्यान अंत्यदर्शन घेता येणार नाही.त्यामुळे शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता अंत्ययात्रेला सुरूवात होणार आहे. शिवसंग्राम भवन – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक- कारंजा चौक – बलभीम चौक – माळवेस चौक – सुभाष रोड – अण्णाभाऊ साठे चौक – शाहूनगर – अंबिका चौक – अंत्यविधी स्थळ. यादरम्यान अंत्ययात्रा मार्ग असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.

मराठा आंदोलनाचा चेहरा

मराठा समाज आपल्या न्याय, हक्कांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला. कोणताही राजकीय नेता आम्हाला आमचा लिडर नको म्हणत मराठा समाजाने आंदोलन पुकारलं. लाखोंचे मोर्चे निघाले. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी आसमंत दुमदुमुन निघाला. या शिस्तबद्ध मोर्चांचा एकच नेता होता, तो म्हणजे सर्वसामान्य मराठा! पण कालांतराने परिस्थिती बदलली.मोर्चेकरांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हळूहळू एक-एकजण पुढे येऊ लागलं. पाहता-पाहता विनायक मेटे यांनी नेतृत्व करायला लागले अन् पाहता-पाहता विनायक मेटे मराठा समाजाच्या आंदोलनाचा आवाज बनले…

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.