राज्यपाल कोश्यारींना संजय राऊतांकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 12 आमदारांच्या नियुक्तीचीही आठवण!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांचं आपल्या स्टाईलमध्ये अभिष्टचिंतन केलं आहे. इतकंच नाही तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती मार्गी लावून महाराष्ट्राला गोड भेट देण्याचं आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केलंय.

राज्यपाल कोश्यारींना संजय राऊतांकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 12 आमदारांच्या नियुक्तीचीही आठवण!
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्वच पक्षांचे नेते कोश्यारी यांना शुभेच्छा देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन भगतसिंग कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांचं आपल्या स्टाईलमध्ये अभिष्टचिंतन केलं आहे. इतकंच नाही तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती मार्गी लावून महाराष्ट्राला गोड भेट देण्याचं आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केलंय. (Happy Birthday to Governor Bhagat Singh Koshyari from MP Sanjay Raut)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शुभेच्छा काही वेगळ्याच म्हणाव्या लागतील. कारण, संजय राऊत यांनी राज्यपालांना शुभेच्छा देताना विधान परिषदेच्या 12 आमदारांची रखडलेली नियुक्ती करुन महाराष्ट्राला गोड भेट देण्याचं आवाहन केलंय.

उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांकडून राजभवनावर जात शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचं अभिष्टचिंतन केलं, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरद्वारे देण्यात आलीय. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज राजभवनावर जात कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

12 आमदारांची यादी 7 महिन्यांपासून राज्यपालांकडेच

ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर 15 जून रोजी सुनावणी झाली. त्यावेळी ही नावांची यादी राज्यपालांकडे सुरक्षित असल्याचं त्यांना कळवण्यात आलं. तर दुसरीकडे 12 आमदार यांच्या नियुक्तीबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 12 आमदारांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, 25 जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. यादी सादर करुन 7 महिने उलटले तरीही राज्यपालांनी नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या : 

राज्यपाल आणि आमचं एकमेकांवर प्रेम, ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत : राऊत

मोठी बातमी: ठाकरे सरकारचे ‘ते’ पत्र काम साधणार; राज्यपालांना आमदारांची नियुक्ती करावी लागणारच?

Happy Birthday to Governor Bhagat Singh Koshyari from MP Sanjay Raut