AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील सर्वाधिक अर्ज दाखल झालेल्या भोकरमध्ये उरले फक्त सात जण

भोकरमध्ये तब्बल 134 उमेदवारी अर्ज (Bhokar assembly seat candidates) दाखल झाले. त्यापैकी 91 अर्ज पात्र ठरले. तब्बल 91 उमेदवार असल्याने प्रशासन आणि अशोक चव्हाण यांना डोकेदुखी ठरणार होती.

राज्यातील सर्वाधिक अर्ज दाखल झालेल्या भोकरमध्ये उरले फक्त सात जण
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Oct 07, 2019 | 4:49 PM
Share

नांदेड : एका दिवसात तब्बल 84 अर्ज मागे घेण्याचा विक्रम नांदेड जिल्ह्यातील भोकर (Bhokar assembly seat candidates) मतदारसंघात नोदवला गेला. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उमेदवार असलेल्या भोकरमध्ये तब्बल 134 उमेदवारी अर्ज (Bhokar assembly seat candidates) दाखल झाले. त्यापैकी 91 अर्ज पात्र ठरले. तब्बल 91 उमेदवार असल्याने प्रशासन आणि अशोक चव्हाण यांना डोकेदुखी ठरणार होती. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 84 उमेदवारांनी माघार घेतली. भोकरमध्ये केवळ 7 उमेदवार रिंगणात आहेत.

नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक 134 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात 85 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. सर्वात कमी नामनिर्देशनपत्रे मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आली. या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 4 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती.

भोकरमध्ये अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अशोक चव्हाण सध्या भोकरमध्येच अडकून आहेत. भाजपने त्यांना श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांच्या रुपाने तगडं आव्हान दिलं आहे. मतदारसंघ पुनर्रचनेच्या अगोदर 2004 ला याच भोकरमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर श्रीनिवास देशमुख गोरठेकर विजयी झाले. मात्र 2009 ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मतदारसंघ सुरक्षित बनला. पण यावेळी अशोक चव्हाणांसाठी ही लढाई सोपी राहिलेली नाही.

लोकसभेला अशोक चव्हाण यांना पराभूत केलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचं पाठबळ गोरठेकरांसोबत आहे. गोरठेकर हे ज्येष्ठ नेते असूनही त्यांनी आतापासूनच प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या चव्हाण यांच्या मतदारसंघात अनेक समस्या कायम आहेत. त्यामुळे आपलाच विजय निश्चित असल्याची खात्री गोरठेकर देतात. गोरठेकर यांच्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली असून अगदी सूक्ष्म पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहेत.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या