घराण्याची 75 वर्षाची निष्ठा संपली… अखेर काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, खान्देशात मोठं खिंडार
75 वर्षे काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिलेल्या पाटील घराण्यातील खान्देशातील एका बड्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

उत्तर महाराष्ट्रातील प्रभावशाली काँग्रेस नेते आणि माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 75 वर्षे काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिलेल्या पाटील घराण्यातील कुणाल पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या खास सोहळ्यासाठी धुळ्यावरून शेकडो समर्थक मुंबईत आले होते. आपल्या परिसरातील विकासासाठी कुणाल पाटील भाजपमध्ये गेले असून आम्ही यांच्यासोबत आहोत अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार कुणाल पाटील यांनी म्हटले की, ‘आज महत्वाचा दिवस आहे. आपण 3 पिढ्यांचा वारसा सोडून सोडून भाजपमध्ये जात आहे हे खरं आहे. माझे वडील आमदार होते हे सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यांनी मला विकासाचा वारसा दिला आहे. माझे वडील मंत्री झाले तेव्हा सायकलने जातं होते. अनेक प्रलंबित प्रश्न त्या काळात पूर्ण झाले पाहिजे होते.’
फडणवीस हे विकासकामे करणारी व्यक्ती – पाटील
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, ‘मी देवेंद्र फडणवीस याच्या विरोधात काम करत होतो, त्या वेळी त्यांच्याकडे काम घेऊन जात नव्हतो, मात्र एकदा गेला त्यांही ते काम केलं. फडणवीस हे विकासकामे करणारी व्यक्ती आहे.माझ्या खान्देशला न्याय मिळाला मला या पुढे काही नको. धुळे जिल्हा महत्वाचा जिल्हा आहे. इशे ग्रोथ सेंटर तयार करायचे हे फडणवीस यांनी सांगितले आहे.’
मी जुन्या लोकांना अडसर ठरणार नाही – पाटील
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, ‘धुळे व जळगावचे लोक खूप समाधानी आहोत. दोन प्रेमाचे शब्द बोलले आणि सन्मान पूर्वक वागणूक दिली तरी बस. तुम्हाला अडसर होईल अशी कुठलीही घटना घडणार नाही, असा मी शब्द भाजपच्या सर्व जुन्या लोकांना देतो. भाजपने या ठिकाणी पक्ष टिकवून ठेवला, याची मला जाणीव आहे. भाजपात जायचं म्हणजे मंत्र व वेद आलं पाहिजे. एक मंत्र लिहून आणला आहे. मी पण धार्मिक आहे. जेव्हापासून लाट आली आहे तेव्हापासून जास्तच देव देव करत आहे. तुम्ही मला चांगले बघितले तर मी पण तुम्हाला चांगला दिसेल.’
