AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का; 66 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, शिवसेनेकडे आता एकच नगरसेवक

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या 67 पैकी 66 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Eknath Shinde : ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का; 66 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, शिवसेनेकडे आता एकच नगरसेवक
| Updated on: Jul 07, 2022 | 11:30 AM
Share

ठाणे : जिल्हा हा शिवसेनेचा (shiv sena) बालेकिल्ला समजला जातो. मात्र आता ठाणे (thane) जिल्ह्यात देखील शिवसेनेला भगदाड पडले आहे. सध्या ठाणे महापालिकेवर कार्यकाळ संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या पंचवार्षिकला ठाणे महापालिकेत शिवसेनेचे एकूण 67 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील 66 नगरसेवक शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के यांचा देखील समावेश आहे. या माजी नगरसेवकांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर जाऊन भेट घेतली व शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. 67 नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या मात्र शिवसेनेतच आहेत. या माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे ठाण्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागपुरातील पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर

दरम्यान केवळ ठाण्यातच नाही तर नागपुरात देखील हीच स्थिती पहायला मिळत आहे. नागपुरातील शिवसेना पदाधिकारी देखील लवकरच शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. नागपुरातील शिवसेनेचे पदाधिकारी हे बंडखोर आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागपुरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे गटात सहभागी होऊ शकतात असा अदांज वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या अनेक शहरातील महापालिकेच्या निवडणुका अवघ्या कही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र ऐन महापालिकेच्या तोंडवरच शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्याने त्याचा मोठा फटका हा शिवसेनेला बसू शकतो. ठाणे, मुंबई आणि औरंगाबाद महापालिका शिवसेनेचा गड माणल्या जातो. मात्र यंदा ही निवडणूक शिवसेनेसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

शिवसेनेची प्रमाणपत्र मोहीम

शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर आता पक्षाकडून सावध पाऊले उचलण्यात येत आहेत. शिवसैनिकांकडून एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र घेतले जात आहे. या प्रमाणपत्रामध्ये आमचा ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असून, आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे लिहून द्यावे लागत आहे. असे प्रमाणपत्र शिवसैनिक, शिवसेनेचे आमदार, पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडून घेतले जात आहे. मात्र तरी देखील शिवसेनेत सुरू असलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. या प्रमाणपत्रावरून अनेकांनी शिवसेनेवर टीका देखील केली आहे.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.