बिहारमध्ये ‘JDU’ आणि ‘RJD’त 77 जागांवर थेट टक्कर, भाजपला फायदा होणार?

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (संयुक्त) यांची 77 जागांवर थेट लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजपला फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसंच चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीचाही भाजपला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बिहारमध्ये 'JDU' आणि 'RJD'त 77 जागांवर थेट टक्कर, भाजपला फायदा होणार?
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 11:23 AM

पाटना: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल विरोधात भाजप आणि जनता दल (संयुक्त) अशी थेट लढत होत आहे. असं असलं तरी स्थानिक पक्ष असलेल्या RJD आणि JDU उमेदवारांमध्ये 77 जागांवर थेट टक्कर होत असल्याचं समोर आलं आहे. RJD आणि JDU च्या या थेट लढतीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकच नाही तर भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यताही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. (Bihar assembly election JDU and RJD face off in 77 seats)

बिहारमध्ये काँग्रेससोबत महाआघाडीचा घटकपक्ष असलेला RJD 144 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर NDA चा घटकपक्ष असलेली नितीशकुमारांची पार्टी अर्थात JDU 115 जागा लढवत आहे. यातील 77 जागांवर RJD आणि JDU च्या उमेदवारंमध्ये थेट लढत होणार आहे. बाकी ३८ जागांवर JDU चे उमेदवार स्वस्तात निवडून येतील अशी शक्यता आहे.

दुसरीकडे बिहारमध्ये भाजप 110 जागा लढवत आहे. त्यातील 51 जागांवर भाजप उमेदवारांची लढत RJD उमेदवारांसोबत होत आहे. अन्य 59 जागांवर भाजप उमेदवारांचा विजय सुकर मानला जातोय. या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोक जनशक्ती पार्टीचा फायदा कुणाला?

चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी अर्थात LJP स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. त्याचाही फायदा भाजपला होऊ शकतो, अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे. काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी तर भाजपकडून चिराग पासवान यांचा आपल्या फायद्यासाठी वापर सुरु असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे.

नितीशकुमार यांचा लालूप्रसाद यादवांवर हल्लाबोल

लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी पती-पत्नीने 15 वर्ष बिहारवर राज्य केलं. त्यावेळी बिहारमध्ये कोणत्याही प्रकारची आरोग्य व्यवस्था नव्हती. बिहार आजारी होतं. मात्र आमच्या काळात आम्ही सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था उभारली. आम्ही इलाज काय असतो हे जनतेला दाखवून दिलं, अशा शब्दात बिगारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू यादव आणि त्यांच्या राष्ट्रीय जनता दलावर टीकास्त्र सोडलं आहे.

संबंधित बातम्या: 

नितीश कुमारांना रोखण्यासाठीच भाजपकडून चिराग पासवानचा वापर- तारिक अन्वर

पती-पत्नीच्या सरकारमुळे बिहार आजारी, आम्ही इलाज करुन दाखवला, नितीश कुमारांचा हल्लाबोल

Bihar assembly election JDU and RJD face off in 77 seats

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.