Bihar Election | बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान; 10 नोव्हेंबरला निकाल

बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

Bihar Election | बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान; 10 नोव्हेंबरला निकाल
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 1:44 PM

नवी दिल्ली: बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोडा यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी एका तासाचा अधिक वेळ देण्यात आलेला आहे. (Bihar assembly elections to be held in 3 phases, says CEC)

बिहारमध्ये विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्यात एकूण 243 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यापैकी 38 जागा अनुसूचित जातीसाठी आणि 2 जागा अनुसूचित जनजातीसाठी राखीव आहेत. बिहारमध्ये सध्या एकूण 7 कोटी 29 लाख मतदार आहेत. 2015 मध्ये ही मतदारसंख्या 6. 68 कोटी एवढी होती. म्हणजे यंदा जवळपास 68 लाख नव्या मतदारांची भर बिहारमध्ये पडली आहे. त्यामुळे हा नवमतदार कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. हा नवमतदार बिहारच्या निवडणुकीचं गणित बदलू शकणार नसला तरी त्याचा या निवडणुकीवर नक्कीच प्रभाव जाणवेल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

बिहार विधानसभा निवडणूक 2020 – तीन टप्प्यात मतदान

पहिला टप्पा – 71 मतदारसंघ – 16 जिल्हे – 31 हजार पोलिंग स्टेशन दुसरा टप्पा – 94 मतदारसंघ – 17 जिल्हे – 42 हजार पोलिंग स्टेशन तिसरा टप्पा – 78 मतदारसंघ – 15 जिल्हे – 33.5 हजार पोलिंग स्टेशन

10 जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान 28 जिल्ह्यात एका टप्प्यात मतदान

पहिला टप्पा मतदानाची तारीख – 28 ऑक्टोबर दुसरा टप्पा मतदानाची तारीख – 3 नोव्हेंबर तिसरा टप्पा मतदानाची तारीख – 7 नोव्हेंबर

निवडणुकांचा निकाल – 10 नोव्हेंबर

मतदानासाठी एक तास अधिक

मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराचं शारीरिक तापमान मोजण्यात येणार असल्याने त्यात वेळ जाणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही पालन केलं जाणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये मतदानाचा कालावधी एका तासाने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत बिहारमध्ये मतदान पार पडणार आहे. मात्र, नक्षल प्रभावित विभागांमध्ये मतदान सायंकाळी ५ वाजताच संपणार आहे.

उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावा लागणार

उमेदवारी अर्ज भरताना रॅली काढून उमेदवारांनी शक्तीप्रदर्शनाच्या नावाखाली गर्दी करू नये म्हणून उमेदवारांकडून ऑनलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच उमेदवारांना प्रतिज्ञापत्रंही ऑनलाइनच भरावे लागणार आहे. अनामत रक्कम सुद्धा ऑनलाइनच भरावी लागणार आहे. नामांकन अर्ज भरताना उमेदवारांसोबत केवळ दोनच लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच केवळ पाचच लोकांना डोअर टू डोअर निवडणूक प्रचार करता येणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. (Bihar assembly elections to be held in 3 phases, says CEC)

एका बुथवर केवळ एक हजार मतदार

संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग असून बिहारमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने संपूर्ण खबरदारी घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये एका बुथवर केवळ एक हजार मतदारांनाच मतदान करता येणार आहे.

6 लाख पीपीई किट्स, 46 लाख मास्क

यावेळी बिहारमध्ये 6 लाख पीपीई किट्सचा वापर केला जाणार आहे. शिवाय राज्य निवडणूक आयोगाला ४६ लाख मास्क आणि 7 लाख हँड सॅनिटायझर देण्यात येणार आहेत. त्याशिवाय 6 लाख फेस शिल्डही देण्यात येणार आहेत. बिहारमध्ये 18 लाख प्रवासी मजूर आहेत. त्यापैकी 16 लाख मजूर मतदान करू शकतात. तर 80 वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक पोस्टल मतदान करू शकतात, असंही आयोगाने स्पष्ट केलं.

कोरोना पीडित मतदान करणार

बिहार विधानसभा निवडणुकीचा यंदाचा प्रचार व्हर्च्युअल होणार असून कोरोना पीडितांनाही मतदान करता येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आरोडा यांनी केली.

70 देशांत निवडणुका नाही

कोरोनाच्या संकटामुळे जगातील 70 देशांमध्ये निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत, याकडे लक्ष वेधतानाच कोरोनाकाळातील देशातील ही सर्वात मोठी निवडणूक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बिहारचे राजकीय बलाबल

एनडीए : 125

राजद : 80

काँग्रेस : 26

सीपीआय : 3

एचएएम : 1

एमआयएम : 1

अपक्ष : 5

खाली : 2

(एकूण जागा 243 सीट)

संबंधित बातम्या:

बिहारचं राजकारण, संख्याबळ ते सत्ताकारण, कोण किती वरचढ?

बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?

बिहार निवडणुकीचा सुशांतसिंह प्रकरणाशी घेणं-देणं नाही – देवेंद्र फडणवीस

बिहार निवडणुकीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

(Bihar assembly elections to be held in 3 phases, says CEC)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.