बिहारमध्ये राजकीय भूकंप! भाजपशी युती तोडण्याचा जेडीयूचा निर्णय, थोड्याच वेळात नितीशकुमार सत्तेतून बाहेर पडत असल्याची घोषणा करणार

महाराष्ट्रपाठोपाठ बिहारमध्येही राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यपालांना भेटणार आहेत.

बिहारमध्ये राजकीय भूकंप! भाजपशी युती तोडण्याचा जेडीयूचा निर्णय, थोड्याच वेळात नितीशकुमार सत्तेतून बाहेर पडत असल्याची घोषणा करणार
आयेशा सय्यद

|

Aug 09, 2022 | 1:57 PM

पटना : बिहारमधून राजकीय भूकंपाची बातमी! महाराष्ट्रात सत्तांतर झालं. अशीच शक्यता सध्या बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) निर्माण झाली आहे. तिथेही सत्तांतराची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपची साथ सोडणाण्याची शक्यता आहे.  बिहारमधलं नितीश कुमार सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) थोड्याच बेळात राज्यपालांना भेटणार आहेत. नितीश कुमार यांनी मागची काही वर्षांपासून भाजपशी जवळीक साधली. पण नितीश कुमार आता भाजपला रामराम करत काँग्रेसच्या (Congress) हातात हात देण्याच्या तयारीत आहेत. भाजप पक्ष फोडत असल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. त्यामुळे नितीश कुमार भाजपसोबत दोन हात लांब राहाणं पसंत करत आहेत. त्यातून ते भाजपशी फारकत घेण्याची शक्यता आहे. बिहारच्या राजकारणात वारंवार बदल होत असतात. सत्तेत आलेलं सरकार स्थिर होईपर्यंत सरकोर कोसळतं! हा इतिहास आहे. याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि जेडीयूची युती तुटण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या हातात हात!

नितीश कुमार यांनी मागची काही वर्षांपासून भाजपशी जवळीक साधली. पण नितीश कुमार आता भाजपला रामराम करत काँग्रेसच्या हातात हात देण्याच्या तयारीत आहेत. नितीश कुमार हे काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. नीतीश कुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतलीये. आरसीपी सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्ष अधिक सक्रिय झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून भाजप आणि नीतीश कुमार यांच्यात नाराजीनाट्य सुरू आहे. त्यामुळे बिहारमधील एनडीएचं सरकार कोसळणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या एक महिन्यात चार वेळा भाजप आणि नितीश कुमार आमने सामने आले आहेत.

बिहारच्या राजकारणात वारंवार बदल होत असतात. सत्तेत आलेलं सरकार स्थिर होईपर्यंत सरकोर कोसळतं! हा इतिहास आहे. याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि जेडीयूची युती तुटण्याची शक्यता आहे. नितीश कुमार लवकरच आरजेडी, आणि काँग्रेसलासोबत जात आघाडी करण्याची शक्यता आहे. मागची काही वर्षे ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्याच सोबत आता आघाडीची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

नव्या सरकारचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. जरी नितीश कुमार यांनी आपला हात पुढे केला असला तरी आरजेडी नेते तेजस्वी यादव हे लालूप्रसाद यादव यांच्या संपर्कात आहेत. त्यांचा सल्ला घेतच ते पुढची पावलं टाकत आहेत. राज्यातील इतर नेतेही नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यास आरजेडी तयार आहे. पण त्याबदल्यात राजद विधानसभेचं अध्यक्षपद, गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद घेणार असल्याची माहिती आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें