AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाणांना माजी मुख्यमंत्र्यांचा जावई देणार टफ फाईट

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई डॉ. अतुल भोसले यांना भाजपने पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाणांना माजी मुख्यमंत्र्यांचा जावई देणार टफ फाईट
| Updated on: Sep 01, 2019 | 10:18 AM
Share

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार ठरला आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे जावई डॉ. अतुल भोसले (Dr. Atul Bhosale) पृथ्वीराज चव्हाणांविरोधात रिंगणात उतरणार आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ही रंगतदार लढत होणार आहे.

अतुल भोसले हे विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या कन्येचे पती आहेत. कराड दक्षिण मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असणार आहेत. त्यांना जनतेने आमदार करावे, आम्ही मंत्री करतो, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी साताऱ्यात केली.

कोण आहेत अतुल भोसले?

डॉ. अतुल भोसले हे कराडचे युवा नेते म्हणून ओळखले जातात. अतुल भोसले हे सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त साताऱ्याची तयारी, युतीची मतदारसंघनिहाय विजयाची रणनीती

अतुल भोसले यांनी 2014 मध्ये भाजपकडून कराड दक्षिण मतदारसंघातून, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती.

या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका पाटील उंडाळकर आणि अतुल भोसले अशी तिहेरी लढत होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला, मात्र विलासकाका आणि अतुल भोसले यांनी त्यांची चांगलीच दमछाक केली होती.

पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी 76 हजार 831 मतं मिळाली होती, तर विलासकाकांना 60 हजार 413 मतं आणि अतुल भोसले यांनी तब्बल 58 हजार 621 मतं मिळवली होती.

पंढरपुरात ठरलं, पृथ्वीबाबांना कराडमध्ये पाडायचं, अतुल भोसलेंना निवडायचं!

विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु होताच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना-भाजप युती निश्चित होणार असल्याचं दोन्ही पक्षांचे नेते सांगत असले, तरी सेना आणि भाजपकडून स्वबळाची चाचपणीही सुरु आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मनोज घोरपडेच भाजपचे उमेदवार असतील. युतीमध्ये ही जागा कोणत्याही पक्षाला मिळाला तरीही उमेदवार मनोज घोरपडेच असतील, अशी घोषणा चंद्रकांत पाटलांनी केली.

मुलं पळवण्याचा आरोप आमच्यावर केला जातो. तुम्ही कोणाला मूल म्हणता? उदयनराजे, शिवेंद्रराजे, रामराजे ही काय पोरं आहेत का? अशा शब्दात पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला. येत्या विधानसभेला विरोधीपक्षांकडे उमेदवारच राहणार नाहीत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त साताऱ्याकडे वाटचाल

सातारा जिल्हा हा कायम काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय. सातारा जिल्ह्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकूण 8 विधानसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादीचे 05, काँग्रेसचे 02 आणि शिवसेना 01 असं संख्याबळ होतं.

सध्या राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश (Satara assembly seats) केलाय, तर काँग्रेसचे जयकुमार गोरे भाजपात जाणार आहेत. याशिवाय फलटणचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण यांची भूमिका रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल, असं बोललं जातंय. कारण, रामराजेंनी अगोदरच राष्ट्रवादी सोडण्याची तयारी दाखवली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.