“हे माझं चुकलं का?” पिंपरीतील भाजप नगरसेवक रवी लांडगे यांची स्वपक्षावर उघड नाराजी

रवी लांडगे यांनी पुण्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावत उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे (BJP Ravi Landge Pimpri Chinchwad)

हे माझं चुकलं का? पिंपरीतील भाजप नगरसेवक रवी लांडगे यांची स्वपक्षावर उघड नाराजी
भाजप नगरसेवक रवी लांडगे यांची पोस्टरबाजी
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 4:53 PM

पिंपरी चिंचवड : भाजप नगरसेवक रवी लांडगे यांनी स्वपक्षाला कोंडीत पकडणारी पोस्टरबाजी केल्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. “सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे माझं चुकलं का?” असा सवाल रवी लांडगेंनी विचारला आहे. (BJP Corporator Ravi Landge questions party on posters in Pimpri Chinchwad)

भोसरी मतदारसंघात पोस्टरबाजी

रवी लांडगे यांनी पुण्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावत उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे माझं चुकलं का? असा थेट प्रश्न रवी लांडगेंनी विचारला आहे. त्यांच्या पोस्टरवर #WeSupportRaviLandge असा हॅशटॅग देऊन पाठिराख्यांना समर्थन देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डावलले

भाजप नगरसेवक रवी लांडगे यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डावलले होते. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात नगरसेवक रवी लांडगे यांनी फलक लावले आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे हे एकमेव बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक होते.

कोण आहेत रवी लांडगे?

रवी लांडगे हे पुण्यातील भाजपचे दिवंगत नेते अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आहेत. इतिहासात पहिल्यांदा भाजपला सत्ता मिळाली तेव्हा लांडगे कुटुंबातील सदस्याला पालिकेतील एक प्रमुख पद मिळावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी शब्द दिल्याचा दावाही नगरसेवक रवी लांडगे यांनी केला होता.

“हे माझं चुकलं का?”

यंदा शेवटची संधी होती, मात्र स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असूनही त्यांना डावलण्यात आलं. अखेर त्यांनी स्थायी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देत पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी आपली उघड नाराजीही व्यक्त केली होती. “चाळीस वर्षांपासून आमचं कुटुंब भाजपची सेवा करतंय, हेच आमच्या कुटुंबाचं चुकलं का?, सोयीचं राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं, गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खाजगीकरणाला विरोध केला, हे माझं चुकलं का?” असे अनेक प्रश्न शहरभर लावलेल्या पोस्टरमधून विचारले जात आहेत. (BJP Corporator Ravi Landge questions party on posters in Pimpri Chinchwad)

रवी लांडगे यांच्यासह इतरही भाजप नगरसेवक स्वपक्षाला कोंडीत धरत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. मात्र लांडगेंच्या या फलकांची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. रवी लांडगेंची पोस्टरबाजी आगामी काळात भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकते.

संबंधित बातम्या :

सांगलीतला राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ पुण्यात फेल! स्थायी आणि शिक्षण समितीवर भाजपचाच अध्यक्ष

सांगलीतील पराभवाचा भाजपला धसका, पुण्यात खबरदारी! नगरसेवकांना व्हिप जारी

सांगलीची पुनरावृत्ती टळली, पिंपरी चिंचवडच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे, राष्ट्रवादीचा पराभव

(BJP Corporator Ravi Landge questions party on posters in Pimpri Chinchwad)

Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.