काँग्रेसला मोठा झटका, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंहांचा भाजपात प्रवेश

काँग्रेस नेते आणि माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह गेल्या काही काळापासून झाकोळले गेले होते. अशावेळी आता कृपाशंकर सिंह यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसला मोठा झटका, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंहांचा भाजपात प्रवेश
कृपाशंकर सिंह भाजप प्रवेश
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 2:20 PM

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी काँग्रेस नेते आणि माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह गेल्या काही काळापासून झाकोळले गेले होते. अशावेळी आता कृपाशंकर सिंह यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेतील अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. (BJP entry of Congress leader Kripashankar Singh)

बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह मधल्या काळात अडचणीत आले होते. तेव्हा पासूनच ते सक्रिय राजकारणातून अडगळीत गेले होते. मात्र, 2019मध्ये जम्मू-काश्मीरमधून आर्टिकल 370 व 35A हटविण्यात आल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर कृपाशंकर सिंह यांनी सवाल केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेच्या निषेधार्थ त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर त्यांनी कोणत्याच पक्षात सामील झाले नव्हते. मात्र, त्यांनी या काळात भाजप नेत्यांशी घरोबा निर्माण केला होता. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंह यांच्या घरी गणपतीलाही येत होते. यावरून सिंह यांनी भाजप नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवल्याचं स्पष्ट होत होतं. त्यानंतर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय.

कृपाशंकर सिंह काय म्हणाले?

अनेकांचे मला भाजप प्रवेश कधी करणार यासाठीचे फोन गेल्या काही दिवसात येत होते. पण माझे एकच उत्तर होते, ते म्हणजे जेव्हा भाजप पक्षाला वाटेल तेव्हा मी भाजप प्रवेश करेन. त्यानुसारच मी गेले अनेक दिवस धीर धरला आणि अखेर भाजप प्रवेशाचा तो दिवस आज उजाडला असल्याचे मत उत्तर भारतीय समाजाचे मुंबईतील जेष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी भाजप प्रवेशाच्या वेळी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी काही दिवसांपूर्वी भेटलो होतो, या भेटीनंतरच यापुढच्या काळात राजकारण करणार ते भाजपकडूनच करणार असे मी मनोमन निश्चित केलं होतं, असं यावेळी कृपाशंकर सिंह म्हणाले.

पालिकेचं गणित बदलणार?

मुंबईत सुमारे 40 ते 50 लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. म्हणजे उत्तर भारतीयांच्या मतांची टक्केवारी 20 ते 25 टक्के आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात उत्तर भारतीयांची मते निर्णायकही आहेत. या उत्तर भारतीय मतदारांमध्ये कृपाशंकर सिंह यांची लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्याचा भाजपला फायदाच होणार असून काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोण आहेत कृपाशंकर सिंग?

कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते आहेत. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो. काँग्रेसच्या सत्ताकाळात 2004 साली कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते. 2009 साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्याचं बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंग यांना जातं, असं मानलं जातं. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंग यांनी भूषवली आहेत.

संबंधित बातम्या :

राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद फिक्स?, मोदींच्या निवासस्थानी दाखल; तर्कवितर्कांना उधाण

भारती पवार यांचा मोदी टीममध्ये समावेश होणार?; पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा

BJP entry of Congress leader Kripashankar Singh

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.