भाजप-शिवसेनेत खाती वाटपावरुन घमासान, अर्थ किंवा महसूल खातं शिवसेनेच्या वाट्याला?

शिवसेनेला अर्थ आणि महसूल खातं देण्यावरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु झाले (BJP offer Finance and revenue post to shivsena) आहेत.

भाजप-शिवसेनेत खाती वाटपावरुन घमासान, अर्थ किंवा महसूल खातं शिवसेनेच्या वाट्याला?
Follow us
| Updated on: Nov 01, 2019 | 9:58 PM

मुंबई : निवडणुकांनंतर युतीने बहुमताचं सरकार स्थापन करणे अपेक्षित होते, मात्र तसं न होता आता युतीतच फूट पडल्याचं चित्र आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेमधील सत्तेच्या वाटाघाटी सुरु असून दुसरीकडे मुख्यमंत्री कोण होणार यावरुन रणकंदन सुरु (BJP offer Finance and revenue post to shivsena) आहे. उपमुख्यमंत्रीपदाच्या ऑफरनंतर आता भाजपकडून शिवसेनेला अर्थ किंवा महसूल मंत्रिपदाचीही ऑफर देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मात्र शिवसेनेला अर्थ किंवा महसूल खातं देण्यावरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु (BJP offer Finance and revenue post to shivsena) आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने नुकतंच शिवसेनेला अर्थ किंवा महसूल खातं देण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र या प्रस्तावाला भाजपमधील काही नेत्यांनी विरोध आहे. शिवसेनेला अर्थ किंवा महसूल खातं देण्यावरुन भाजपमध्ये घमासान सुरु झालं आहे. मात्र जर शिवसेनेला सत्तेत घ्यायचं असेल, तर त्यांना महत्त्वाची खाती देणे गरजेचं असल्याचे भाजपमधील एक गटाचे म्हणणे आहे. तर भाजपमधील दुसरा गट अर्थ किंवा महसूल खाते देण्यात विरोध करत आहे

भाजप-शिवसेनेमध्ये सध्या कोणाला कोणती खाती द्यावी यावरुन घमासान सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून महत्त्वाच्या खात्यांसाठी दबावतंत्र सुरु आहे. भाजपने नगरविकास आणि गृह खाते देण्यास नकार दर्शवला आहे. त्यानंतर आता भाजपने शिवसेनेला अर्थ किंवा महसूल खातं देण्याची तयारी दर्शवली (BJP offer Finance and revenue post to shivsena) आहे.

यापूर्वीही भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह तब्बल 16 मंत्रिपदं देण्याची तयारी दर्शवली होती. त्यासोबतच केंद्रात एक वाढीव कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली होती. यासह राज्यातील महत्त्वाची दोन मंत्रीपद शिवसेनेला देणार असल्याचे सांगितलं जातं आहे. यात अर्थमंत्री, कृषीमंत्री, गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेला देऊ, असे भाजपकडून सांगण्यात येत (BJP offer Finance and revenue post to shivsena) आहे.

युतीत पेच कायम

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर राजकीय वातावरण तापलेलं (BJP-Shivsena Alliance) आहे. निवडणुकांनंतर युतीने बहुमताचं सरकार स्थापन करणे अपेक्षित होते, मात्र तसं न होता आता युतीतच फूट पडल्याचं चित्र दिसून येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या ठरलेल्या 50-50 च्या फॉर्म्युल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मागितलं आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कुठलाही फॉर्म्युला ठरलं नसल्याचं सांगितल आहे. त्यामुळे युतीमध्ये तेढ निर्माण झाली आहे.

आता शिवसेनेने सरकार स्थापनेसाठी भाजपवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शिवसेनेने विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठीही सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे, तर भाजप मात्र या विषयावर उडवाउडवीचे उत्तरं देत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात नेमकं कुणाचं सरकार स्थापन होणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

संजय राऊतांना शिवसेनेकडून अधिकृतपणे बोलण्याचा अधिकार नाही : प्रसाद लाड

… तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची वेळ येईल : सुधीर मुनगंटीवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपचे पोस्टर्स!

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, काँग्रेसचं शिष्टमंडळ सोनिया गांधींच्या भेटीला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.